जळगाव मिरर | १७ फेब्रुवारी २०२४
शहरालगत असलेल्या सावखेडा येथील जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूल आयोजित व मुख्याध्यापिका तेजल ओझा यांच्या मार्गदर्शनाखाली जी. एच. रायसोनी स्पोर्ट अॅन्ड कल्चरल फाउंडेशनतर्फे जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत पहिला आणि दुसरा दिवस कॅरम, चेस, स्विमिंग, स्पीड स्केटिंग व बास्केटबॉल या विविध स्पर्धेत विध्यार्थ्यानी केलेल्या चमकदार कामगिरीमुळे गाजला. आज, शनिवार जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धाचा दुसरा दिवस असून, रविवार रोजी सकाळी ठीक ११ वाजता बक्षीस वितरण समारंभ रंगणार आहे. जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूल आयोजित जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत यंदा काय नवे पाहायला मिळणार याकडे जिल्हाभरातील हजारो क्रीडाप्रेमीचे लक्ष लागून आहे. जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलच्या प्रशस्त अश्या क्रीडांगणावर या स्पर्धा संपन्न होत असून या स्पर्धेत यंदा रुस्तमजी इंटरनॅशनल स्कूल, विद्या इंग्लिश मीडियम स्कूल, ओरियन स्कूल, पोद्दार स्कूल, उज्ज्वल इंग्लिश स्कूल, जिजामाता स्कूल, गुरुकुल स्कूल, सेंट तेरेसा स्कूल, सेंट जोसेफ स्कूल, अनुभूती स्कूल, बोहरा इंटरनॅशनल स्कूल, एसजीएस हायस्कूल, शिंदे इंटरनॅशनल स्कूल, बालविश्व स्कूल यासह पाचोरा व एरंडोल येथील विविध स्कूलमधील ३५० खेळाडूंचा उत्स्फूर्त सहभाग आहे. तसेच विजेत्यांना १० हजार रुपये रोख व आकर्षक चषक देऊन गौरवण्यात येणार आहे.
या विविध स्पर्धाचे परीक्षण प्रवीण ठाकरे- बुद्धिबळ, आयशा खान- कॅरम व बबलू पाटील- बास्केटबॉल हे करीत असून या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी जी. एच. रायसोनी स्पोर्ट अॅन्ड कल्चरल फाउंडेशन व मार्केटिंग प्रमुख अमिता सिंग, जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलचे व्यवस्थापक प्रशांत महाशब्दे, क्रीडाशिक्षक संजय चव्हाण व कमलेश नगरकर हे सहकार्य करीत आहे .
विविध स्पर्धेत गटनिहाय विजेते खेळाडू
“कॅरम” १४ वर्ष वयोगट मुले :- प्रथम – आवेश चौधरी (जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूल), द्वितीय – अल्फेज पिंजारी (अनुभूती स्कूल), तृतीय – धीरज घुगे (अनुभूती स्कूल)
“कॅरम” १४ वर्ष वयोगट मुली :- प्रथम – श्रावणी मोरे (विद्या इंग्लिश स्कूल), द्वितीय – पूर्वा भुतडा (विद्या इंग्लिश स्कूल) तृतीय – कार्तिकी वानखेडे (विद्या इंग्लिश स्कूल)
“कॅरम” १२ वर्ष वयोगट मुले :- प्रथम – विहान तलरेजा (जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूल), द्वितीय – शैलेश खोरे (अनुभूती स्कूल), तृतीय – सोहम अडवाणी (जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूल)
“कॅरम” १२ वर्ष वयोगट मुली :- प्रथम – दुर्गेश्वरी दोनगडे (विद्या इंग्लिश स्कूल), द्वितीय – प्रांशी मंधुने (जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूल), तृतीय – यशश्री मुनोत (जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूल)
“कॅरम” १० वर्ष वयोगट मुले :- प्रथम – युग तलरेजा (जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूल), द्वितीय – जैनम गुडिया (जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूल), तृतीय – इवान जैन (जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूल)
“बुद्धिबळ” १४ वर्ष वयोगट मुले :- प्रथम – क्षितीज सुशांत वारके (पोद्दार स्कूल), द्वितीय – अंकिता दुग्गड (बालविश्व स्कूल), तृतीय – सोहम बढे (पोद्दार स्कूल)
“बुद्धिबळ” १४ वर्ष वयोगट मुली :- प्रथम – नव्या खरे (पोद्दार स्कूल), द्वितीय – रेवती वंजारी (विद्या इंग्लिश स्कूल), तृतीय – नाझ्मीन पटेल (जळगाव म्युन्सिपल स्कूल),
“बुद्धिबळ” १२ वर्ष वयोगट मुले :- प्रथम – तसीन रफिक तडवी (सेंट टेरेसा स्कूल), द्वितीय – श्लोक वारके (पोद्दार स्कूल), तृतीय – श्रीव पाटील (बोहरा इंग्लिश स्कूल)
“बुद्धिबळ” १२ वर्ष वयोगट मुली :- प्रथम – झुनेरा शैख (जळगाव म्युन्सिपल स्कूल), द्वितीय – अरीबा चौधरी (जळगाव म्युन्सिपल स्कूल), तृतीय – शिफा चौधरी (जळगाव म्युन्सिपल स्कूल),
“बुद्धिबळ” १० वर्ष वयोगट मुले :- प्रथम – गौरव बोरसे (अनुभूती स्कूल), द्वितीय – नैतींक मुनोत (जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूल), तृतीय – कार्तिक तोतला (उज्वल इंग्लिश स्कूल)
“बुद्धिबळ” १० वर्ष वयोगट मुली :- प्रथम – आरुषी लोखंडे (के. के. इंटरनॅशणल स्कूल)
“बास्केटबॉल” १४ वर्ष वयोगट मुले :- प्रथम – पाचोरा बास्केटबॉल ग्रुप , द्वितीय – सेंट जोसेफ स्कूल जळगाव, तृतीय – जिजामाता स्कूल एरंडोल
“बास्केटबॉल” १४ वर्ष वयोगट मुली :- प्रथम – सेंट जोसेफ स्कूल जळगाव, द्वितीय – विद्या इंग्लिश स्कूल, तृतीय – रायसोनी हायस्कूल जळगाव