जळगाव मिरर | २२ फेब्रुवारी २०२४
छत्रपती शिवाजी महाराजांकडे उत्तम शासक, आणि राज्य व्यवस्थापन याची दूरदृष्टी होती. त्यांच्या ५० वर्षांच्या आयुष्यात जिंकलेले ३५० च्यावर गड किल्ल्यांचे साम्राज्य व युद्धात कामी आलेल्या मावळ्यांच्या, सरदारांच्या कुटुंबांचे पालन पोषण साठी केलेली पेन्शन व्यवस्था याची साक्ष असल्याचे प्रतिपादन व्याख्याते तथा सिने अभिनेते डॉ. राहुल सोलापूरकर यांनी केले. जळगाव येथील विजया केसरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अविनाश पाटील यांच्यातर्फे स्वामी लॉन्स पाचोरा येथे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते यावेळी ते बोलत होते.
ते म्हणाले की तत्कालीन आदिलशाही निजामशाही अन्य शहा यांच्या काळात बखर महारांनी शिवाजी महाराजांचे वेगवेगळे चित्रण केले आहे शिवाजी महाराज कसे होते हे माहीत नाही, परंतु शत्रूंमध्ये त्यांची दहशत मोठ्या प्रमाणात होती. आयुष्यात छत्तीस वर्षे लढाई व गड किल्ले व्यवस्थापन याच्यातच गेली यात सुरतेची लूट करताना तेथील हिरे मानके व जवाहिरे यांचा पुरेपूर उल्लेख फ्रेंच डच ब्रिटिश यांच्या पत्रलेखात आहे.
मी खानाला मारण्यासाठी विजापूरच्या मार्गाने जात आहे त्या मार्गात कुणालाही सोडू नका असा उल्लेख बाजीप्रभूंच्या दिलेल्या पत्रात आहे. आम्ही स्वराज्य रक्षणासाठी कामी आलो तर आमचे कुटुंब उघडे पडणार नाही यासाठी शिवाजी महाराजांच्या सैन्यात युद्धावर कामी आलेल्या मावळ्यांच्या कुटुंबाला वर्षभरासाठी लागणारा खर्च पेन्शन स्वरूपात दिलेला आहे यातून शिवाजी महाराजांचे उत्तम व्यवस्थापन कौशल्य लक्षात येते.
शत्रूंमध्ये महाराजांची प्रचंड दहशत
शिवाजी महाराज कसे दिसत होते हे माहीत नाही. परंतु शत्रूंमध्ये असलेली दहशत या संदर्भातील लेखन ब्रिटिश गव्हर्नर चौल याने केलेले असल्याचे राहुल सोलापूरकर यांनी सांगितले.
दोन चित्र लंडनच्या मुझियम मध्ये
छत्रपती शिवाजी महाराजांचे आजचे प्रचलित चित्र भालजी पेंढारकर यांनी दळवी नामक चित्रकार यांचेकडून अंदाजाने चित्रित केलेले आहे यात शिवाजी महाराजांचा पद्धतीचा आहे परंतु छत्रपती शिवाजी महाराजांची दोन अधिकृत प्रतिमा किंवा चित्रे लंडनच्या म्युझियममध्ये आहेत.
उत्तम व्यवस्थापन दृष्टी
शिवाजी महाराजांकडे उत्तम व्यवस्थापन दृष्टी होती, याची अंमलबजावणी केली जात असल्याचे जनरल मोटर्स कंपनीचे मालव लिहिलेले आहे.
चौरंग करण्याची शिक्षा
सैन्यात एखाद्या व्यक्तीने फितूर होऊन चुकी केली किंवा गुन्हा केल्यास त्या व्यक्तीचे दोन्ही हात दोन्ही पाय छाटण्यास दिलेली शिक्षा म्हणजेच चौरंग करावा असा उल्लेख छत्रपती शिवरायांच्या ताम्रपटात एका सुभेदाराकडच्या कुटुंबाकडे आहे.
सुरतेवर स्वारी
शिवाजी महाराजांनी सुरतेच्या स्वारीच्या वेळी त्यांच्याकडे असलेल्या घोडदळाच्या इतके दुप्पट घोडदळ घेतलेले होते. त्यांनी दोन वेळा सुरत लुटले.
दाऊद खानाला त्या खिंडीत गाठले
सुरतेची दुसऱ्या वेळी लुटिवरून परत येत असताना दाऊद खान कुरेशी हा मुघलांचा सरदार महाराजांच्या मागावर होता. ही बातमी हेरानी दिली. महाराज सुरतेची लूट करून नाशिकच्या वणी दिंडोरीच्या मार्गाने जात असताना दाऊद खानाला त्या खिंडीतच गाठून हल्ला केला दाऊद खान पळून गेला यासंदर्भात मी जिवंत पळून आलो हे नशीब. मेलो असतो तर पण जिवंत राहिलो असतो तर किल्ले बांधणी कामासाठी दगड वाहणारा मजुराची स्थिती केली असती म्हणून पाठ देऊन आलो असा उल्लेख बखरकारांनी केलेला असून या लढाईत 14 सरदार शिवाजी महाराजांनी जेरबंद केले असल्याचे देखील म्हटले आहे.
धर्मकार्यात सहभाग लक्षात घेत संरक्षण
मोहनदास पारक या ब्रिटिशांचे दलाली करणाऱ्या व्यापाऱ्याने हिंदू मंदिरे, व्यवस्थापन, सण, उत्सव आदी धर्मकार्यात सहभाग दिलेला होता हे लक्षात घेता सूरज लुटी दरम्यान त्या व्यापाऱ्याच्या घराला व कुटुंबाला महाराजांच्या सैन्याने पूर्णपणे संरक्षण दिल्याचा उल्लेख आहे.
विश्वास ठेवण्यासारखे ब्रिटिश नाहीत
विविध प्रांतात व्यापारी म्हणून आलेले परकीय हे साधेसुधे नाहीत. दमण येथील व्यापारी संदर्भात हे साधेसुधे नाहीत डोळ्याचे काजळ काढून घेतील व त्याचा रोजगारही मागतील व त्या पाठोपाठ स्थानिकांवर आक्रमण करून मुलुख बळकवतील हे महाराजांनी जाणून घेतले होते.
राज्यकारभाराची तसेच शेतीसाठी जलसिंचनाची दूरदृष्टी
शिवाजी महाराजांच्या राज्यात महसूल अर्थव्यवस्थापन कृषी कृषी तसेच अन्य विविध खात्यांचा कारभार साठी अष्टमंडळ नेमले होते. हे अष्टप्रधान महाराजांनी नेमून दिलेल्या खात्यांचा कारभार व्यवस्थित रित्या करीत होते तसेच दर दोन पाच वर्षांनी अवर्षण दुष्काळ कमी पर्जन्यमान हे निसर्गचक्र लक्षात घेता शेतीसिंचनासाठी व्यवस्था पाहता सर्वसामान्य रयतेकडून कर वसुली करताना पहिले पीक घेऊ द्यावे व दुसऱ्या पिकाच्या वेळी कर वसूल करावा जेणेकरून शेतकरी देखील सुखी राहील व आगामी शेती पिकांची व्यवस्था करणे सुलभ होईल अशी दूरदृष्टी शिवाजी महाराजांच्या राज्यव्यवस्थापन कारभारात असल्याचे डॉ. राहुल सोलापूरकर यांनी सांगितले