जळगाव मिरर | १ मार्च २०२४
शहरातील अजिंठा चौफुलीजवळील भुसावळरोडरील रोडवर गावठी कट्ठयाासह जिवंत काडतूस घेवून दहशत माजविणारा सराईत रेकॉर्डवरील गुन्हेगार अर्शद शेख हनिफ उर्फ अन्ना (वय २६, रा. गेंदालाल मिल) याच्या एमआयडीसी पोलिसांनी मुसक्या आवळल्या. त्याच्याकडून गावठी कट्टा व जिवंत काडतूस जप्त करण्यात आले असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील अजिंठा चौफुलीवरील भुसावळ रोडवर असलेल्या रस्त्यावर अर्शद शेख हनिफ उर्फ अन्ना हा विना परवाना गावठी कट्टा घेवून दहशत माजवित असल्याची माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना मिळाली. त्यांनी तात्काळ गुन्हे शोध पथकातील कर्मचाऱ्यांना कारवाईसाठी रवाना केले. या पथकाने अजिंठा चौफुलीजवळ गेले असता, अर्शद शेख उर्फ अन्ना हा संशयास्पद रित्या फिरतांना आढळून आला. त्याची चौकशी केली असता, त्याच्याकडून ३५ हजार रुपये किंमतीचे गावठी पिस्टल व दोन जिवंत काडतूस जप्त केले आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे हे करीत आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
ही कारवाई पोलीस निरक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि दत्तात्रय पोटे, दीपक जगदाळे, स.फौ. अतुल वंजारी, किरण पाटील, सुधीर साळवे, सचिन पाटील, किशोर पाटील, ललित नारखेडे, राहुल रगडे, नितीन ठाकूर यांच्या पथकाने केली.