जळगाव मिरर | ३ मार्च २०२४
गेल्या काही महिन्यापासून राज्यातील मराठा समाज व सरकारमध्ये चांगलेच वातावरण तापले असतांना नुकतेच राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जीवे मारण्याची धमकी आणि आक्षेपार्ह वक्तव्य प्रकरणात दुसरी अटक करण्यात आली आहे. सांताक्रुझ पोलिसांनी साताऱ्याचा रहिवाशी किंचक नवले याला अटक केली आहे.
मराठा आरक्षणासंदर्भात मुलाखत देताना देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. याचा व्हिडिओ फेसबुकवर शेअर केल्याप्रकरणी गुरवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे सोशल मीडिया सेलचे उपाध्यक्ष योगेश सावंत यांना देखील अटक झाली होती.
काय घडल नेमक
एका मराठा आंदोलकाने ‘गावरान विश्लेषक’ यूट्युब चॅनलवर आपली संतप्त प्रतिक्रिया दिली होती. यामध्ये या अज्ञात व्यक्तीने देवेंद्र फडणवीसांबाबत एकेरी उल्लेख करत आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. योगेश सावंत यांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. मात्र या चॅनेलवर कारवाई करण्याआधीच अगोदर योगेश सावंत यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते अक्षय पनवेलकर यांच्या तक्रारीवरुन हा गुन्हा दाखल झाला होता. अक्षय यांच्या तक्रारीनंतर आधी नवी मुंबई परिसरातून योगेश सावंत यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. योगेश सावंत सध्या १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत आहेत.