• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home Uncategorized

यासाठी रहावे आपण तंदुरुस्त

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
May 8, 2022
in Uncategorized
0
यासाठी रहावे आपण तंदुरुस्त
Share on FacebookShare on Twitter

खेळाचे विश्व असो किंवा मनोरंजन विश्व असो फिटनेस सगळ्याच ठिकाणी महत्त्वाचा असतो. फिटनेस नसेल तर चालून येणाऱ्या संधीदेखील हातातून निघून जाता. आपण बरेचदा टीव्हीवर बघितले असेल की स्पोर्ट्समनला आपला फिटनेस जपावा लागतो. हेल्दी वजन आणि उंची मेंटेन ठेवावी लागते, म्हणूनच आपल्या क्षेत्रामध्ये टिकून राहण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला आपला शारीरिक फिटनेस व मानसिक फिटनेस जपण्याची आवश्यकता असते.

शारीरिक फिटनेस बाबत बरेच लोक आजही जागरूक नाहीत याच कारणांमुळे अगदी पस्तीस-चाळीशीमध्ये लोकांना हार्ट अटॅक, डायबेटिस, ब्लडप्रेशर यासारखे आजार होत आहेत व अगदी तरुण वयामध्ये कायमस्वरूपी औषधे व गोळ्या खाण्याचे दुष्टचक्र मागे लागते. जर योग्य व्यायाम व कसरत केली तर आपल्या शरीरातील सर्व यंत्रणा व्यवस्थितपणे व सुरळीत काम करतात, ज्यामुळे आपल्या इंद्रियांना व्यायामाची सवय लागते व सर्व संप्रेरक ग्रंथी व्यवस्थित काम करतात.

मानवी शरीरामध्ये हार्मोनल ग्लँड म्हणजेच संप्रेरक ग्रंथी असतात, या ग्रंथी ऍक्टिव्हेट होण्यासाठी व या ग्रंथीतून निघणारा ग्रंथी स्त्राव म्हणजेच हार्मोन्स आपल्या शरीराच्या मेटाबोलिजमवर व अवयवांच्या कार्यपद्धतीवर परिणाम करत असतात. ज्यामुळे संप्रेरके आपली कामे इंद्रियांकडुन व्यवस्थितपणे करून घेत असतात. ही संप्रेरके म्हणजेच हार्मोन्स! जर हार्मोन्स योग्य प्रमाणामध्ये व योग्य वेळी स्त्रवले गेले नाही तर अनेक शारीरिक व मानसिक आजार उत्पन्न होतात. हार्मोनल इम्बॅलन्समुळे महिला आणि पुरुषांमध्ये अनेक आजारांना निमंत्रण दिले जाते.

हार्मोन्सची पातळी योग्य राहण्यासाठी तसेच आपल्या अवयवांचा योग्य ताळमेळ राहण्याकरता शरीरातून विषारी पदार्थ बाहेर निघणे आवश्यक असते. आज -कालची लाईफस्टाईल व खादाड वृत्तीमुळे अनेक लोक मिळेल ते खातात ज्यामुळे शरीरातील अवयवांवर अतिरिक्त चरबी जमा होते. त्या चरबीमुळे शरीरातील नाजूक अवयवांवर भार येतो आणि इथेच आपल्या हार्मोन्स मध्ये गडबड होते. महिलांच्या ओव्हरीजमध्ये स्त्रवणारे इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन या हार्मोनचे कार्य सुरळीत चालले नाही तर महिलांमध्ये वंध्यत्वाच्या समस्या निर्माण होतात. तसेच मासिक पाळी संबंधी गंभीर आजार देखील निर्माण होतात. पुरुषांच्या बाबतीत देखील अतिरिक्त चरबी साचल्यामुळे टेस्टोस्टेरॉन या हार्मोनच्या पातळीमध्ये कमतरता येते व पुरुषांना देखील वंध्यत्वाच्या व इंद्रिय शिथिलक्षम होण्याच्या समस्येचा सामना करावा लागू शकतो!

अतिरिक्त चरबी वाढल्यामुळे आज काल सगळ्यात जास्त भेडसावणारी समस्या म्हणजे प्रजनन संस्थेची समस्या आहे. अनेक महिला पुरुष या समस्यांनी त्रस्त आहेत. तीस-पस्तीशीली तरुण मुलं हार्ट अटॅक ने मरत आहेत. वयाच्या पंचविसाव्या वर्षी काही लोकांना ब्लड प्रेशरची गोळी सुरू झाली आहे. वीस- बावीस वर्षाच्या मुलांचे मानसिक संतुलन बिघडून त्यांना डिप्रेशन, नैराश्य अशा आजारांचा सामना करावा लागत आहे.

सुदृढ शरीर व प्रसन्न मन असेल तर व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये आपली सर्व स्वप्ने पूर्ण करण्यासाठी सक्षम होते. सुंदर काया, निरोगी मन हीच खरी जीवनाची संपत्ती आहे. ज्याचे शरीर स्वस्थ व मन निकोप राहते त्या व्यक्तीला कुठल्याही संकटांना सामना करताना चिंता करण्याची गरज पडत नाही. आपण आपल्या शरीराचा फिटनेस जपण्याकरता अनेक मार्ग अवलंबु शकतो.

ज्यामध्ये बरेच लोक पारंपरिक कसरती, जोर बैठका, कुस्ती-तालिम, उठाबशा, सकाळी उठून सूर्यनमस्कार करणे असे व्यायाम करतात. काही लोक योगासने करतात. आधुनिक काळात फिटनेससाठी जिम जॉईन करुन व्यायाम व कसरत करवून घेतली जाते. तर काही लोक केवळ सकाळी जॉगिंग करणे हा उत्तम आरोग्याचा मूलमंत्र जपताना आपण पाहिले असेल! तर काही लोक सायकलिंग करुन व्यायाम करतात! आजकाल संगीताच्या तालावर झुंबा व ऍरोबिक्स याप्रकारचे व्यायामाचे नवे प्रकार सुद्धा रुढ होताना दिसत आहेत. पद्धत कोणती का असेना मात्र शरीराचा व्यायाम होणे आवश्यक असते!

व्यायाम केल्यामुळे शरीरातील हाडे व स्नायू मजबूत होतात. व्यायामामुळे शरीरांतील विषारी टाकाऊ पदार्थ घामावाटे बाहेर टाकले जातात तसेच पचन क्रिया व एकुणच इंद्रियसंस्था, अवयव, ऊती आणि पेशींचे कार्य व्यायामामुळे सुधारते. व्यायाम केल्याने कोणत्याही प्रकारच्या आजारांना थारा मिळत नाही.

व्यायाम करताना काही टिप्स मी तुम्हाला देत आहें 

१) व्यायाम कोणताही का असेना पण व्यायाम करण्याअगोदर वार्म करणे आवश्‍यक असते. वार्म- अप केल्यामुळे शरीरातील सर्व अवयव हे व्यायाम करण्यासाठी तयार होतात.जखडलेले स्नायू, अशक्त हाडे ही व्यायम केल्याने मजबूत व मोकळी होतात व व्यायाम करताना सुलभता येते.

२) व्यायाम करून घाम गाळल्यामुळे आपण आपल्या शरीरावरील अतिरिक्त चरबी घटवण्याचे काम करत असतो, अशामध्ये जिममध्ये व्यायाम करताना वारंवार पाणी पिऊ नये.

३)जिममध्ये व्यायाम करताना आपल्याला माहीत नसलेली उपकरणे जिम् इंस्ट्रक्टरला विचारल्याशिवाय हाताळू नये. जिम ट्रेनर व इंस्ट्रक्टरच्या सूचनांचे पालन व्यवस्थित केल्यास आपल्याला फिटनेस सोबत सुडौल व स्वस्त शरीर मिळेल.

४) योगासने करताना सुरुवातीपासून हळूहळू सोप्या पासून अवघडाकडे वाटचाल करत योगासने करावीत. जर आपण नवीन असाल तर योगासने करताना श्वासाच्या अभ्यासाबद्दल संपूर्ण माहिती घ्यावी व हळूहळू एकेक योगासन शिकावे.
श्वासावर नियंत्रण करत श्वासावर ध्यान ठेवत योगासनं केल्यामुळे शरीराला त्याचा लाभ मिळतो.

५) सूर्यनमस्कार करताना देखील अतिघाईमध्ये सूर्यनमस्कार करू नये. किमान पंधरा ते वीस सेकंद एका सुर्य नमस्काराच्या कृती व आसनाकरता दिले पाहिजे. तसेच सुर्यनमस्कार करताना श्वासाच्या गतीकडे लक्ष दिले पाहिजे. श्वास आत घेणे व श्वास बाहेर सोडणे याचा निश्चित क्रम अभ्यायामुळे शिकता व अंगीकारता येतो.

६) कोणताही व्यायाम केल्यानंतर लगेचच जेवन करु नये तसेच ज्युस ,फळे खाऊ नये. तसेच कोणताही व्यायाम केल्यानंतर शारीरिक थकवा जाण्याकरता स्ट्रेचिंग करावी.ज्यामुळे अवयांमध्ये लवचिकता येते.

रोजच्या आहारामध्ये काय असावे ?
१) सकाळी उठल्यानंतर नियमितपणे रात्रभर पाण्यात भिजवलेले बदाम सोलुन खावे आणि सोबतच एक ग्लास गरम दूध प्यायले पाहिजे.

२) बदामामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते फायबरयुक्त आहार घेतल्यामुळे आपल्या शरीराला व पचन क्रियेला त्याचा लाभ होतो.

३)बदामामध्ये विटामिन ई असल्याने बदाम आपल्या आरोग्यासाठी हितकारक असतात. रोज सकाळी दूध प्यायल्यामुळे आपल्याला शक्ती व बळ मिळते. कारण आहारशास्त्रानुसार दूध हे एक संपूर्ण जेवण मानले जाते.

४) दुधामध्ये भरपूर प्रमाणात विटामिन्स व प्रोटीन असते. तसेच रात्री झोपताना देखील दूध प्यायले पाहिजे. झोपण्याअगोदर एक तास अगोदर नियमित दूध प्यायले पाहिजे.

या लेखातून आपण जीवनोपयोगी सकस आहाराचे महत्व,व्यायामचे महत्व, अन्नतील पोषकघटकांचे महत्व,शारीरिक तंदुरुस्ती करता कोणत्या गोष्टी प्रकर्षाने टाळल्य‍ा पाहिजे याबाबतचे विस्तृत विवरण केले आहे. व्यायामाचे प्रकार,व्यायाम करताना व्यायाम करण्यापूर्वी व व्यायामानंतर घेण्याची खबरदारी यावर आपण या लेखातून चर्चा केली. पोषणतत्व कोणत्या पदार्थांमध्ये अधिक असते याबद्दलची माहिती मिळवली. आपले काही प्रश्न असतील तर माझ्या
इंस्ताग्राम पेज @ishwarhireofficial
Youtube @geneticsmobility
यावर नक्की कळवा.

ईश्वर हीरे
Fitness coach

Related Posts

जळगाव सार्वजनिक बांधकाम विभागातील टेंडर प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह; सेवानिवृत्त कर्मचाऱ्याच्या मुलाला वारंवार कामे?
Uncategorized

जळगाव सार्वजनिक बांधकाम विभागातील टेंडर प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह; सेवानिवृत्त कर्मचाऱ्याच्या मुलाला वारंवार कामे?

September 24, 2026
पहाटे घरातून निघाला अन् थेट रेल्वे रुळावर गेला : तरुणाचा दुर्देवी मृत्यू !
Uncategorized

पहाटे घरातून निघाला अन् थेट रेल्वे रुळावर गेला : तरुणाचा दुर्देवी मृत्यू !

September 18, 2026
जळगावातील पाच प्रमुख मार्गांच्या दुरुस्तीसाठी मनपाचा बांधकाम विभागाला आदेश ; नगरसेविकेच्या तक्रारीची दखल  !
Uncategorized

जळगावातील पाच प्रमुख मार्गांच्या दुरुस्तीसाठी मनपाचा बांधकाम विभागाला आदेश ; नगरसेविकेच्या तक्रारीची दखल !

September 4, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
Uncategorized

यावलमध्ये १४ वर्षीय मुलीवर अत्याचाराचा आरोप; स्मशानभूमी परिसरात नेल्याची धक्कादायक घटना

September 3, 2026
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या छात्रसंघ व सिनेट निवडणुकीत अभाविपचा ९ पैकी ९ जागांवर विजय!
Uncategorized

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या छात्रसंघ व सिनेट निवडणुकीत अभाविपचा ९ पैकी ९ जागांवर विजय!

September 3, 2026
वाळू तस्करांवर तालुका पोलिसांचा दणका; विनापरवाना वाहतूक करणारे दोन पिकअप जप्त !
Uncategorized

चिमुकल्याला वाहनाने चिरडले; संतप्त जमावाचा उद्रेक, चालकाला वाचवताना पोलिसांनाच धक्काबुक्की!

August 27, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
जळगावात पोलीस असल्याचे सांगून वृद्धाची भररस्त्यावर केली फसवणूक !

रेशनच्या धान्याचा खासगी गोदामात साठा : नगाव खुर्दच्या दोघा भावांविरुद्ध गुन्हा दाखल !

October 3, 2026
‘घरी सोडतो’ म्हणत रिक्षेत बसवले, पुढे लुटले : सोन्याची पोत हिसकावणारे तिघे जेरबंद !

‘घरी सोडतो’ म्हणत रिक्षेत बसवले, पुढे लुटले : सोन्याची पोत हिसकावणारे तिघे जेरबंद !

October 3, 2026
बहिणीची भेट ठरली अखेरची ; वृद्धाने संपविली जीवनयात्रा

तरसोद बायपासवर काळाचा घाला : भरधाव ट्रकच्या धडकेत जळगावातील दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू !

October 3, 2026
आ.मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश : चाळीसगाव येथे ३०० बंदी क्षमतेचे खुले जिल्हा कारागृह मंजूर !

आ.मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश : चाळीसगाव येथे ३०० बंदी क्षमतेचे खुले जिल्हा कारागृह मंजूर !

October 2, 2026

Recent News

जळगावात पोलीस असल्याचे सांगून वृद्धाची भररस्त्यावर केली फसवणूक !

रेशनच्या धान्याचा खासगी गोदामात साठा : नगाव खुर्दच्या दोघा भावांविरुद्ध गुन्हा दाखल !

October 3, 2026
‘घरी सोडतो’ म्हणत रिक्षेत बसवले, पुढे लुटले : सोन्याची पोत हिसकावणारे तिघे जेरबंद !

‘घरी सोडतो’ म्हणत रिक्षेत बसवले, पुढे लुटले : सोन्याची पोत हिसकावणारे तिघे जेरबंद !

October 3, 2026
बहिणीची भेट ठरली अखेरची ; वृद्धाने संपविली जीवनयात्रा

तरसोद बायपासवर काळाचा घाला : भरधाव ट्रकच्या धडकेत जळगावातील दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू !

October 3, 2026
आ.मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश : चाळीसगाव येथे ३०० बंदी क्षमतेचे खुले जिल्हा कारागृह मंजूर !

आ.मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश : चाळीसगाव येथे ३०० बंदी क्षमतेचे खुले जिल्हा कारागृह मंजूर !

October 2, 2026

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group