नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशातील लोकसभा निवडणूक व काही राजाय्तील विधानसभांची धामधूम सुरु होणार आहे. त्यापूर्वी सार्वत्रिक निवडणुका 2024 आणि राज्य विधानसभांचे वेळापत्रक जाहीर करण्यासाठी निवडणूक आयोग शनिवारी, 16 मार्च रोजी पत्रकार परिषद घेणार आहे. दुपारी 3 वाजता ही पत्रकार परिषद होणार असून ती ECI च्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून थेट प्रक्षेपित केली जाईल.
एका दिवसापूर्वी दोन निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करण्यात आली आहे. ज्ञानेश कुमार आणि सुखबीर संधू हे नवीन निवडणूक आयुक्त आहेत ज्यांनी शुक्रवार, 15 मार्च रोजी पदभार स्वीकारला. योगाच्या तिन्ही अधिकाऱ्यांनी शुक्रवारीच निवडणूक कार्यक्रमासंदर्भात बैठक आयोजित केली होती.
5 फेब्रुवारी रोजी निवडणूक आयोगाने सर्व राजकीय पक्षांना निवडणूक प्रचारात कोणत्याही स्वरूपात लहान मुलांचा वापर करू नये, असा सल्ला दिला आहे. पक्षांना पाठवलेल्या ॲडव्हायझरीमध्ये, निवडणूक पॅनेलने पक्ष आणि उमेदवारांना निवडणूक प्रक्रियेदरम्यान पोस्टर आणि पॅम्प्लेट वाटणे आणि घोषणाबाजी करणे याला शून्य सहनशीलता व्यक्त केली आहे.
