जळगाव मिरर | १६ मार्च २०२४
लोकसभा निवडणुकीच्या २०२४ च्या तारखा जाहीर झाल्या असून सात टप्प्यांत ५४३ जागांसाठी मतदान होणार आहे. 19 एप्रिल ते 1 जून या कालावधीत चालेल. 4 जूनला निकाल लागणार आहे. मतदानापासून निकालापर्यंत 46 दिवस लागतील. लोकसभेसोबतच आंध्र प्रदेश, ओडिशा, अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम या चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखाही जाहीर झाल्या आहेत.
महाराष्ट्रात पाच टप्प्यात मतदान होणार आहे. 26 एप्रिलला पहिला तर 25 मे रोजी शेवटचा टप्पा असेल. 26 एप्रिलपासून, 7 मे, १३ मे, २० मे, २५ मे रोजी मतदान असेल तर ४ जूनला मतमोजणी होईल, अशी माहिती केंद्रीय निवडणुक आयुक्तांनी दिली आहे. तसेच तसेच 26 विधानसभा जागांवर पोटनिवडणूक होणार असून यात महाराष्ट्राचाही समावेश आहे. महाराष्ट्रातील एका जागेवर पोटनिवडणूक होणार आहे.
आम्ही प्रत्येक जिल्ह्यात सर्व निवडणूक पक्षांसोबत चर्चा केली आहे. आम्ही महिला मतदारांवर जास्त भर दिला आहे. महिलांचा मतदानाचा वाटा वाढला आहे. महिला मतदारांची संख्या 12 राज्यात पुरुषांपेक्षा जास्त आहे. प्रत्येक मतदार केंद्रावर पाणी, शौचालय, व्हील चेअर या सगळ्याची व्यवस्था केली आहे, अशी माहितीही निवडणूक आयोग आयुक्तांनी दिली.
