जळगाव मिरर | २३ मार्च २०२४
शहरातील नवीन कानळदा रोड परिसरातील शिव शंकर कॉलनी येथे स्व.धनराज प्रकाश चव्हाण यांच्या दिव्तीय पुण्यस्मरणार्थ अखंड हरीनाम संकीर्तन साप्ताह दि.२७ मार्च बुधवार पासून सुरु होत आहे. यावेळी कथावाचक ह.भ.प.श्रीराम महाराज पाटील (उंटावदकर) यांच्या वाणीतून होणार आहे.
यात दि.२७ मार्च रोजी ह.भ.प.कृष्ण महाराज(चाळीसगावकर) यांचे कीर्तन रात्री ८ ते १० यावेळेत तर दि.२८ मार्च रोजी ह.भ.प.नाना महाराज (दोंडाईचाकर) यांचे कीर्तन रात्री ८ ते १०, दि.२९ मार्च रोजी ह.भ.प.मनोज महाराज(एणगावकर) यांचे कीर्तन रात्री ८ ते १०, दि.३० मार्च रोजी ह.भ.प.संजय महाराज(कासोदेकर) यांचे कीर्तन रात्री ८ ते १०, दि.३१ मार्च रोजी ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज(कदानेकर) यांचे कीर्तन रात्री ८ ते १०, दि.१ एप्रिल रोजी ह.भ.प.सूर्यभान महाराज(शेळगावकर) यांचे कीर्तन रात्री ८ ते १०, दि.२ एप्रिल रोजी ह.भ.प.राजेंद्र महाराज(कासोदेकर) यांचे कीर्तन रात्री ८ ते १०, दि.३ एप्रिल रोजी ह.भ.प.महेश महाराज (उंटावदकर) यांचे कीर्तन रात्री ८ ते १० असा दिनक्रम असून काकड आरती सकाळी ५ वाजेला कथेची वेळ दुपारी १ ते ४ हरिपाठ संध्यकाळी ६ वाजता. तर दिंडी सोहळा
दि.२ एप्रिल रोजी संध्याकाळी ४ वाजता. महाप्रसाद दि.३ एप्रिल दुपारी १२ वाजेपासून या सप्ताहाला गायनाचार्य ह.भ.प.जगन्नाथ महाराज, जयेश महाराज, पखवाज वादक – जनार्दन महाराज, कृष्णा महाराज, मंगल महाराज, साई माऊली भजनी मंडळ, तर कथेचे आयोजन प्रकाश पांडुरंग चव्हाण, सुशीला प्रकाश चव्हाण यांनी केले असून तरी जास्तीत जास्त भाविकांनी कथेचा लाभ घ्यावा असे आवाहन देखील करण्यात आले आहे.