जळगाव मिरर | २६ मार्च २०२४
देशात आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून रायगडच्या जागेवर सुनील तटकरे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतवण्यात आलं आहे. आज झालेल्या पत्रकार परिषदेत अजित पवार यांनी त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली. लोकसभेच्या रायगड मतदारसंघात महायुतीमध्ये प्रचंड चढाओढ सुरू होती. अखेर हा तिढा सुटला आहे. मात्र बारामती मतदारसंघाचा सस्पेन्स कायम ठेवला आहे. महायुतीच्या जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही, त्याआधीच अजित पवार यांनी रायगडच्या जागेची घोषणा करत ९९ टक्के का पूर्ण झालंचं भाष्य त्यांनी केलं आहे.
आढळराव पाटील आज सायंकाळी अजित पवार गटात प्रवेश करणार . २० वर्षांनंतर पाटील यांचा शिरूरमध्ये पक्षप्रवेश होत आहे. शिरूरमध्ये होणाऱ्या कार्यक्रमात त्या लोकसभा मतदारसंघातील उमेदवाराची घोषणा केली जाणार आहे. बाकीच्या जागा २८ तारखेला जाहीर करू असं अजित पवारांनी म्हटलं आहे. मात्र महायुतीतून अजित पवार गटाला किती जागा मिळाल्या याबाबत बोलण्याचं त्यांनी टाळलं. महायुतीच्या जागा वाटपाबाबत व्यवस्थित मार्ग काढला जाईल. ९९ टक्के काम पूर्ण झालं असून युतीतील मित्र पक्षांनी जागा वाटपाबाबत सहकार्य केल्याचंही ते म्हणाले.
2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला २३ जागा मिळाल्या होत्या. शिवसेनेच्या १८ जागा निवडून आल्या. ४ राष्ट्रवादी काँग्रेस, १ नवनीत राणा आम्ही त्यांना पाठिंबा दिला होता. एमआयएमची एक जागा होती. राष्ट्रवादीला फक्त ३ जागा मिळतात, कारण नसताना अशी चर्चा पसरवली गेली. मात्र कार्यकर्त्यांचं समाधान होईल तेवढ्या जागा मिळाल्या आहेत. एकत्र पत्रकार परिषद घेऊन आम्ही ते जाहीर करू. बारामतीत तुमच्या मनात ज्यांच नाव आहे, त्यांच नाव जाहीर होणार आहे, असं देखील अजित पवार म्हणाले आहेत. त्यामुळे बारामतीचा सस्पेन्स कायम आहे.
लोकसभा निवडणुकांची राष्ट्रवादीच्या आमदार आणि मंत्र्यांवर जबाबदारी देण्यात आली आहे. आमदार विधानसभा आणि मंत्री लोकसभा निवडणुकीत काम करतील. स्टार प्रचारक म्हणून लवकरच जाहीर करू, हे सर्व महायुतीचेच प्रचारक असतील. तर निवडणुकीत राष्ट्रवादीचे प्रमुख धनंजय मुंडे असतील, अशी माहिती त्यांनी दिली.
