• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

स्त्रीबीज तस्करी प्रकरणाचे धागेदोरे चोपड्यापर्यंत; बनावट आधारकार्ड बनवणारा संशयित अटकेत !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
March 6, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण, ब्रेकिंग, राजकीय, राज्य
0
स्त्रीबीज तस्करी प्रकरणाचे धागेदोरे चोपड्यापर्यंत; बनावट आधारकार्ड बनवणारा संशयित अटकेत !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ६ मार्च २०२६

बदलापूर येथे उघडकीस आलेल्या स्त्रीबीज तस्करी प्रकरणाचे धागेदोरे आता जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यापर्यंत पोहोचले आहेत. या प्रकरणात बनावट आधारकार्ड तयार करणाऱ्या सतीश दिलीप चौधरी (वय ३५) याला बदलापूर पोलिसांनी चोपडा तालुक्यातील चहार्डी येथून अटक केली आहे. या गुन्ह्यात आतापर्यंत सात जणांना अटक करण्यात आली असून, अनेक महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्या स्त्रीबीजांची मागणी केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सतीश चौधरी हा मूळचा चहार्डी, ता. चोपडा येथील रहिवासी आहे. मात्र गेल्या सात ते आठ वर्षांपासून तो कुटुंबासह नाशिक येथे वास्तव्यास होता. नाशिकमध्ये राहात असतानाच त्याचा बनावट आधारकार्ड तयार करणाऱ्या टोळीशी संपर्क आला. या टोळीच्या माध्यमातून त्याने काही व्यक्तींना बनावट आधारकार्ड बनवून दिल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

दरम्यान, त्याने आपल्या शेजारी राहणाऱ्या एका व्यक्तीसाठीही बनावट आधारकार्ड तयार करून दिले होते. योगायोगाने तोच इसम स्त्रीबीज तस्करी प्रकरणात पकडला गेला. या प्रकरणाची माहिती मिळताच सतीश चौधरी याने नाशिकमधील आपला ठावठिकाणा बदलत चहार्डी येथे आश्रय घेतला. मात्र बदलापूर पोलिसांनी या प्रकरणाचा माग काढत चोपडा पोलिसांच्या मदतीने चहार्डी येथील त्याच्या राहत्या घरावर छापा टाकला आणि त्याला अटक केली.

या कारवाईत तपासी अधिकारी पोलिस उपनिरीक्षक केशव हासगुळे आणि त्यांच्या पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली. संशयिताच्या अटकेनंतर या प्रकरणातील आणखी काही धागेदोरे समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, राज्यातील आयव्हीएफ केंद्रांबाबतही प्रशासनाने गंभीर भूमिका घेतली आहे. राज्यातील सुमारे ८६० आयव्हीएफ केंद्रांची गृह आणि आरोग्य विभागाकडून संयुक्त तपासणी करण्यात येणार असल्याची घोषणा गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी विधान परिषदेत केली आहे. त्यामुळे या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातील काही आयव्हीएफ केंद्रेही पोलिसांच्या रडारवर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सतीश चौधरीच्या अटकेनंतर या प्रकरणात काही धक्कादायक बाबी समोर येत आहेत. जळगाव आणि चोपडा परिसरातील काही व्यक्तींनाच नव्हे, तर नाशिक आणि बदलापूर येथे आयव्हीएफ उपचारासाठी जाणाऱ्या काही रुग्णांनाही त्याने बनावट आधारकार्ड बनवून दिल्याचा संशय पोलिसांना आहे.

या संपूर्ण प्रकरणातील तस्करीचे जाळे उलगडण्यासाठी गुन्हे शाखेची पाच पथके विविध ठिकाणी तपास करत आहेत. या रॅकेटचे आणखी धागेदोरे समोर येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

Related Posts

​जळगावात शिवसेनेच्या वतिने महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिनानिमित्त कष्टकऱ्यांचा गौरव
जळगाव

​जळगावात शिवसेनेच्या वतिने महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिनानिमित्त कष्टकऱ्यांचा गौरव

May 1, 2026
जळगाव शहर महानगरपालिकेत उत्साहात संपन्न झाला महाराष्ट्र दिन
जळगाव

जळगाव शहर महानगरपालिकेत उत्साहात संपन्न झाला महाराष्ट्र दिन

May 1, 2026
अमळनेरमध्ये ग्रामपंचायत अधिकाऱ्याला ५० हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक! !
क्राईम

अमळनेरमध्ये ग्रामपंचायत अधिकाऱ्याला ५० हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक! !

April 30, 2026
जळगाव जिल्ह्याचे युवा पुरस्कार जाहीर; महाराष्ट्र दिनी पालकमंत्र्यांच्या हस्ते होणार गौरव
जळगाव

जळगाव जिल्ह्याचे युवा पुरस्कार जाहीर; महाराष्ट्र दिनी पालकमंत्र्यांच्या हस्ते होणार गौरव

April 30, 2026
बच्चू कडूंचा ‘भगवा’ निर्णय : उपमुख्यमंत्री शिंदेंच्या  उपस्थितीत शिवसेनेत दमदार प्रवेश !
जळगाव

बच्चू कडूंचा ‘भगवा’ निर्णय : उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत दमदार प्रवेश !

April 30, 2026
शहरातील सेवा तपासणीसाठी सभापतींची सरप्राईज एन्ट्री; अधिकाऱ्यांना तातडीच्या सूचना
जळगाव

शहरातील सेवा तपासणीसाठी सभापतींची सरप्राईज एन्ट्री; अधिकाऱ्यांना तातडीच्या सूचना

April 30, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
​जळगावात शिवसेनेच्या वतिने महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिनानिमित्त कष्टकऱ्यांचा गौरव

​जळगावात शिवसेनेच्या वतिने महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिनानिमित्त कष्टकऱ्यांचा गौरव

May 1, 2026
जळगाव शहर महानगरपालिकेत उत्साहात संपन्न झाला महाराष्ट्र दिन

जळगाव शहर महानगरपालिकेत उत्साहात संपन्न झाला महाराष्ट्र दिन

May 1, 2026
तुम्हाला तुमच्या बॉस किंवा सहकाऱ्यांकडून पाठिंबा मिळेल, जे तुमच्या मेहनतीचे आणि वचनबद्धतेचे कौतुक करतील.

बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण होतील आणि तुमचा प्रभाव वाढेल.

May 1, 2026
अमळनेरमध्ये ग्रामपंचायत अधिकाऱ्याला ५० हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक! !

अमळनेरमध्ये ग्रामपंचायत अधिकाऱ्याला ५० हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक! !

April 30, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group