जळगाव मिरर | १५ एप्रिल २०२४
रोजलॅण्ड इंग्लिश मिडीयम स्कूलचे क्रिडा शिक्षक जितेंद्र सुरेश सोनवणे यांना जळगाव जिल्हा शारीरिक शिक्षण व क्रिडाशिक्षक महासंघातर्फे जिल्हास्तरीय आदर्श क्रीडाशिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
जितेंद्र सोनवणे सर यांनी विद्यार्थांना प्रत्येक खेळासाठी वेळोवेळी योग्य मार्गदर्शन करून बाह्य क्रीडास्पर्धेत सहभागी करून त्यांना पारितोषिके पटकविण्यासाठी प्रोत्साहित केले. संस्थेच्या अध्यक्षा रोजमीन खिमाणी प्रधान मॅडम यांनी सोनवणे सर यांना नेहमीच सहकार्य केले . प्रत्येक विद्यार्थांच्या सुप्त क्रीडागुणांना वाव मिळावा यासाठी संस्था व क्रीडा शिक्षक यांनी नेहमीच पुढाकार घेतला आहे . याच कार्याची दखल घेऊन सोनवणे सर यांना सन्मानित करण्यात आले . यासाठी संस्थेच्या अध्यक्षा रोजमीन खिमाणी प्रधान मॅडम तसेच मुखाध्यापक, सर्व शिक्षक यांनी सोनवणे सर यांचे अभिनंदन केले .



















