जळगाव मिरर | २० एप्रिल २०२४
जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड बिजनेस मॅनेजमेंट महाविध्यालयातर्फे दुसऱ्या दीक्षांत समारंभाचे नुकतेच आयोजन करण्यात आले. या समारंभात एकूण ७१२ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. हा कार्यक्रम कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे प्र. कुलगुरू प्रा. एस.टी.इंगळे ह्यांच्या अध्येक्षतेखाली महाविद्यालयाच्या सभागृहात संपन्न झाला तर जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट जळगावचे अॅडव्हायझरी बोर्ड व आयक्यूएसीचे मेंबर सिए दर्शन जैन हे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते. तसेच व्यासपीठावर जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल, बोर्ड ऑफ गव्हर्नन्स मेंबर प्रमोद संचेती, अकॅडमिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत, परीक्षा नियंत्रक गौरव तिवारी व रजीस्टार अरुण पाटील यांची यावेळी उपस्थिती होती.
पदवीप्रदान समारंभाच्या प्रास्ताविकेत जी. एच. रायसोनी महाविद्यालयाच्याच्या उद्दिष्टांविषयी बोलताना संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल म्हणाल्या की, रायसोनी ग्रुप ऑफ इस्टीट्यूटचे अध्यक्ष श्री. सुनीलजी रायसोनी यांचे व्हिजन व महाविद्यालयातील प्राध्यापक व इतर सहकाऱ्यांच्या सहकार्यामुळेच आज रायसोनी अभियांत्रिकी व बिजनेस मॅनेजमेट महाविध्यालय “स्वायत्त” या एक्सलन्स पातळीला गाठू शकले. महाविद्यालयाच्या स्थापनेपासून दर्जेदार शिक्षणाची कास आम्ही कधीही सोडली नाही तसेच नवनवीन उद्योग विशिष्ट अभ्यासक्रम सुरु करण्यास आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. केंद्रीय शिक्षण मंत्रालय व इन्स्टिट्यूट इनोव्हेशन कौन्सिल अंतर्गत महाविद्यालयात वर्षभर घेण्यात आलेल्या विविध उपक्रमाचे परीक्षण करून नुकतेच भारत सरकारने ‘थ्री.फाईव्ह’ स्टार रेटिंग’ देऊन सन्मानित केले. असे मानांकन मिळविणारे रायसोनी महाविद्यालय हे उत्तर महाराष्ट्रातील एकमेव महाविद्यालय आहे. २०२० ते २०२४ या काळात बरेचेसे सर्टिफिकेट कोर्सेस आम्ही आंतरराष्ट्रीय पातळीवरील ऑर्गनायजेशन सोबत सुरु केले आहेत. डाटा सायन्स, ब्लॉक चैन टेक्नोलॉजी, बिजनेस अॅनलीटीक्स यासारख्या कोर्सेस आम्ही आंतरराष्ट्रीय पातळीच्या ऑर्गनायजेशन सोबत सुरु केले आहे. तसेच आम्ही प्रभावीरित्या नविन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण राबवीत असून यात युनिवर्सल ह्युमन व्हेल्यू व ‘इंडियन नॉलेज सिस्टीम’ चे अद्यावत सेंटर असून विविध कोर्सेसचे देखील एनइपीनुसार विध्यार्थ्यांचे अध्ययन येथे सुरु आहे. तसेच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना नियमित शिक्षणासोबतच कौशल्य आधारित शिक्षण मिळावे आणि नवीन कौशल्य आधारित तांत्रिक शिक्षणाचा विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्धीसाठी उपयोग व्हावा हा मुख्य उद्देश समोर ठेवून विविध उद्योग केंद्रासोबत रायसोनी इस्टीट्युटने सामंजस्य करार केला आहे. थेरीपेक्षा प्रॅक्टिकल ज्ञानाला प्राधान्य देत विविध अॅक्टिव्हिटी देखील महाविद्यालयात राबविण्यात येतात यात मास्टर क्लब, लेट्स टोक क्लब, म्युझिक क्लब, डान्स क्लब, फॅब्रिकेशन क्लब, पिंक हॅट्स क्लब, फोटोग्राफी क्लब यासारख्या विद्यार्थ्यांच्या सर्वागीण विकासासाठी उपयुक्त ठरणाऱ्या विविध उपक्रमाचा समावेश आहे.
तसेच ‘आयपीआर’अंतर्गत महाविद्यालयाने २०६ कॉपीराईट, ५५ पेटंट प्राप्त झाले असून अवघ्या चार तासांत ७४ कॉपीराईट नोंद करण्याची कामगिरी फॅकल्टीने केली आहे. बौद्धिक मालमत्ता अधिकार, इनोव्हेशन, स्टार्टअप, उद्योजकता यावर महाविद्यालयात सातत्याने जागृती कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. त्यामध्ये विविध क्षेत्रातील तज्ञ मान्यवर मार्गदर्शन करतात.” “स्मार्ट इंडिया हॅकेथॉन, आयबीएम नॅसकॉम हॅकेथॉन, मंथन हॅकेथॉन आदी स्पर्धांमध्ये राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर रायसोनी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी यश मिळवले आहे. एनपीटीईएल स्वयम, एनआयटीटीटी ऑनलाईन अभ्यासक्रम उपक्रमाचे सक्रिय सभासद असलेल्या रायसोनी महाविद्यालयातील अनेक प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी सुवर्ण, रौप्य मानांकन पटकविले आहे, तसेच सायबर सिक्युरिटी, ड्रोन मेकिंग, कॉम्प्युटर ऍप्लिकेशन, एआय अशा विविध विषयावर देखील विध्यार्थ्यासाठी विविध मार्गदर्शन कार्यक्रम राबविले जातात असे सांगत, येत्या काळात समाजाच्या, उद्योगाच्या व इतरांच्या ज्या आमच्या रायसोनी इस्टीट्यूट कडून अपेक्षा आहेत त्या आम्ही निश्चितच पूर्ण करू असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सिए दर्शन जैन यांनी अनमोल मार्गदर्शन करून उपस्थित विद्यार्थ्यांची मने जिंकली. त्यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, “आजचा दिवस तुमच्या आई वडिलांकरीता अभिमानाचा क्षण आहे .विद्यार्थ्यांनी त्यांच्या आवडीनुसार क्षेत्र निवडून सर्वश्रेष्ठ कामगिरी करावी असे सांगितले. याकरिता त्यांनी ऑलम्पिक स्पर्धेतील धावपटूचे उदाहरणे दिली. आताच्या वैज्ञानीक जगात विद्यार्थी सर्वगुणसंपन्न असला पाहिजे तसेच त्याच्यामध्ये संशोधक जिज्ञासू वृत्ती असली पाहिजे, आपल्याकडे संशोधन, संस्कृती रुजवली गेली पाहिजे असे सांगितले. आपण विज्ञान लहानपणापासून शिकत आलो आहोत, परंतु फक्त पाठांतर न करता, सर्व आंधळेपणाने न स्वीकारता आपल्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाले पाहिजेत. तंत्रज्ञान प्रत्येक क्षणाला बदलत आहे ,त्यामुळे कौशल्ये वाढवा ,समर्पण ठेवा व संशोधनात आंनद घ्या असा संदेश देत त्यांनी कठोर मेहनत, नियमितता आणि वक्तशीरपणा याचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगितले. यानंतर या समारंभात अध्यक्षस्थानी उपस्थित असलेले कबचौ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे प्र. कुलगुरू प्रा. एस.टी.इंगळे यांनी आपले मत व्यक्त करतांना म्हटले कि, “बियोंड व्हिजन” हे ब्रीद वाक्य हाती घेवून रायसोनी इस्टीट्यूटने आतापर्यतच्या आपल्या कार्यकाळात अनेक विकासपर्व गाठले आणि इस्टीट्यूटची यशस्वी घौडदौड कायम राखत झपाट्याने प्रगती केली. काळाच्या ओघात अनेक बदल स्वीकारत ही इस्टीट्यूट आजपावेतो अबाधित व कालांतराने चालणारी एक प्रगल्भ शैक्षणिक चळवळ म्हणून नावारूपास आली आहे तसेच स्वायत्तता दर्जा व एनबीएचे नामांकन प्राप्त झाल्याने रायसोनी इस्टीट्यूटच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. तसेच संशोधन, नवनिर्मिती, जॉब ओरिएटेड कोर्सेस यासहीत युजीसी एआयसीटीईच्या गाईडलाईन नुसार महाविद्यालयात विविध उपक्रम राबविण्यात येतात तसेच आपल्या भागातील बहुतांश मुले,मुली ही शहरी व ग्रामीण पार्श्वभूमीतून येतात त्यामुळे त्यांच्या समग्र व्यक्ती महत्व विकास करण्याची जबाबदारी असते त्यामुळे रायसोनी महाविध्यालयात असलेल्या विविध कौशल्य आधारित अभ्यासक्रमामुळे विध्यार्थ्याना नक्कीच आपल्या पुढील वाटचालीसाठी फायदा होईल असे मत व्यक्त करत ‘प्रत्येक विद्यार्थ्याच्या जीवनात पदवी संपादन करणे हे मोठे यश असते. त्याच्यासाठी आणि त्याच्या पालकांसाठी ती अभिमानाची बाब असते. शिक्षण संस्थांसाठी हे विद्यार्थी त्यांचे राजदूत म्हणून व्यावसायिक जीवनात प्रवेश करतात. विद्यार्थी त्यांच्या नव्या आणि स्वतंत्र मार्गावर वाटचाल सुरू करतात. वेगळ्या पद्धतीने विचार करू लागतात. त्यांनी शिक्षण घेताना प्राप्त केलेले ज्ञान आणि व्यावसायिक कौशल्यांचा उपयोग समाजासाठी मोलाचे योगदान देण्यासाठी करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले. यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महाविद्यालयातून मागील वर्षी पदवी परीक्षा उत्तीर्ण केलेल्या एमबीए, एमसीए, बीबीए, बीसीए, बी.ई.-आयटी, बी.ई.-ई अँड टी सी, बी.ई.-ईई, बी.ई.-सीई, बी.ई.-एमई, बी.ई.-सीएसई असे सर्व शाखेचे एकूण ७१२ पदवीधर विद्यार्थ्यांना पदवी वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अंजली बियाणी यांनी केले तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक तथा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी महाविद्यालयातून मागील वर्षी शिकून गेलेले पदवीधर विद्यार्थी, विद्यार्थीनी व त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*११ विद्यार्थ्यांनी केली “सुवर्ण पदकां”ची कमाई*
निखिल किरण पाटील (एमबीए), शेफाली नामदेव मंधान (एमएमएस), आचल संजय कांकरिया (एमसीए), कांचन भास्कर माळी (बीबीए), ममता भाऊसाहेब पाटील (बीसीए), माधुरी ज्ञानेश्वर घुगे (बी.ई.-सीएसई), सय्यद शाहनवाझ अमिनुद्दीन (बी.ई.-आयटी) दिपक महावीर सैनी (बी.ई.-एमई), कार्तिक महेश पाटील (बी.ई.-सीई), शुभम सुसंता रॉय (बी.ई.-ईई), पल्लवी प्रदिप सुर्वे (बी.ई.-ई अँड टी सी)
*या विद्यार्थ्यांनी केली “रौप्य पदकां”ची कमाई*
यश जगदीश लढढा,(एमबीए), बेदमुथा वृषाली राकेश (एमसीए), रामचंदानी गुंजन दिलीप (बीबीए), चिंचोरे मोहिनी मनोहर (बीसीए) थोरात प्राजक्ता भारत (बीसीए), जैन हार्दिक प्रफुलकुमार (बी.ई.-सीएसई), चित्ते दिव्या भास्कराव (बी.ई.-आयटी)खंबायत भूषण खेमचंद्र (बी.ई.-एमई), भोपले नयना संजय(बी.ई.-सीई), सपकाळे हर्षदा देविदास(बी.ई.-ईई), कासार वैष्णवी प्रमोद (बी.ई.-ई अँड टी सी)