जळगाव मिरर | २ मे २०२४
न्यू एरा एज्युकेशन रोजलॅण्ड इंग्लिश मिडीयम हायस्कूल मराठी माध्यम हायस्कूल मध्ये महाराष्ट्र दिन, कामगार दिन बुधवार (दि. 1 मे) रोजी जल्लोषात साजरा करण्यात आला. यानिमित्त संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात बलिदान दिलेल्या 106 हुतात्म्यांचे स्मरण करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुणे सौ.इंदिरा सुशीलकुमार झुनझुनवाला यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. रोजलॅण्ड इंग्लिश मिडीयम च्या सौ. सीता तिवारी मॅडम व मराठी माध्यमाच्या शालेय मुख्याध्यापिका सौ. वंदना सोले मॅडम व प्राथमिक माध्यमिक विभागाचे इतर शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
महाराष्ट्र दिन हा महाराष्ट्र राज्याची निर्मिती दिवस म्हणून साजरा केला जातो. 1 मे 1960 रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र राज्याची निर्मिती झालेली आहे. या दिवशी महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी बलिदान दिलेल्या 106 हुतात्म्यांचे स्मरण या दिवशी केले जाते. महाराष्ट्रात जन्माला येणं म्हणजे पूर्वजन्मीचं पुण्य सार्थक झाल्यासारखे आहे. प्रत्येकाला गर्व असावा असा आपला हा महाराष्ट्र!
छत्रपती शिवाजी महाराज, ज्योतिबा फुले, शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर,अनेक संत यांच्या विचारांनी निर्माण झालेला महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्रात अनेक थोर महापुरुष होऊन गेले आहेत असे वक्तव्य करून, महाराष्ट्र दिन व कामगार दिन याविषयीची माहिती आपल्या मनोगतातून प्रमुख पाहुणे सौ.इंदिरा सुशीलकुमार झुनझुनवाला यांनी दिली. सदर कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन शालेय मुख्याध्यापिका डॉ. हर्षा खडके यांनी केले.सर्व शिक्षक वर्ग व शिक्षकेतर कर्मचारी, या कार्यक्रमात सहभागी झाले होते



















