जळगाव मिरर | ५ मे २०२४
लोकसभा निवडणुकीची राज्यात धामधूम सुरु असतांना आज तिसऱ्या टप्प्यासाठी ७ एप्रिल रोजी मतदान पार पडणार आहे. या वेळेत बेकायदेशीर पैशांचा वापर होऊ नये म्हणून पोलिसांनी चोख नाकाबंदी केली आहे. यातच बीड शहरातून एक मोठी बातमी समोर आली आहे. खामगाव चेक पोस्टवर पोलिसांनी तब्बल १ कोटी रुपयांची रोकड जप्त केली आहे. यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका कारमधून ही रोकड नेली जात होती. वाहनाची तपासणी करत असताना कारमध्ये लोखंडी पेटी आढळून आली. पोलिसांनी कारचालकाकडे याबाबत विचारपूस केली. त्याने ही रक्कम द्वारकादास मंत्री बँकेची असल्याचे सांगितले. परंतु त्याच्याकडे आवश्यक कागदपत्र आढलून आले नाही. दरम्यान, सध्या पोलिसांनी ही रोकड ताब्यात घेतली आहे. यावेळी कसल्याच प्रकारचे बारकोड संबंधिताकडे नसल्याने अनेक संशय व्यक्त होत आहेत.
