जळगाव मिरर | ७ मे २०२४
राज्यात प्रतिबंधित असलेल्या गुटख्याची विक्री करणाऱ्या संतोषी माता चौकातील किराणा दुकानावर एमआयडीसी पोलिसांच्या पथकाने रविवारी दुपारी छापा टाकला. याठिकाणाहून १ लाख ३१ हजार रु पयांचा गुटखा जप्त करण्यात आला. याप्रकरणी दुकान मालक दीपक रमेशचंद गंगराळे (वय ४०, रा. रामेश्वर कॉलनी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, शहरातील संतोषी माता चौकातील कृषी उत्पन्न बाजार समिती सुरेशदादा जैन कॉम्पलेक्समधील श्री समर्थ कृपा प्रोव्हीजन या दुकानात राज्यात प्रतिबंधित असलेला गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांची विक्री केली जाते. अशी माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलस निरीक्षक बबन आव्हाडा यांना मिळाली. त्यांनी लागलीच गुन्हे शोध पथकातील कर्मचाऱ्यांचे पथक तयार करुन कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार पथकाने रविवारी दुपारी पावणेतीन वाजेच्या सुमारास दुकानावर छापा टाकला. यावेळी दुकानाची झाडाझडती घेतली असता, त्याठिकाणाहून १ लाख ३१ हजार रुपयांचा गुटखा, पान मसाला व तंबाखूजन्य पदार्थ मिळून आले. हा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून याप्रकरणी पोलीस कर्मचारी छगन तायडे यांनी दिलेल्या तक्रारीवरुना दुकान मालक दीपक रमेशचंद गंगराळे रा. रामेश्वर कॉलनी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. सी. मनोरे, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, सफौ अतुल वंजारी, पोहेकॉ गणेश शिरसाळे, छगन तायडे, पोकॉ हेमंत पाटील, महिला पोकॉ कविता गवई यांच्या पथकाने केली




















