जळगाव मिरर | १० मे २०२४
शहरातील मेहरुण तलाव शिवारात एका इमारतीच्या ठिकाणी सेटींग काम करत असताना, अचानक ९ व्या मजल्यावरुन तोल जाऊन पडल्याने बंडू वना सोनवणे (वय ५२, रा. आसोदा रोड, गुरुदत्त कॉलनी) या मजुराचा जागीच मृत्यू झाला. ही घटना बुधवार दि. ८ मे रोजी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील असोदा रोडवरील गुरुदत्त कॉलनीत बंडू सोनवणे हे आपल्या कुटुंबासह वास्तव्यास होते. सेंटीगचे कामी, करून ते आपला उदरनिर्वाह करत होते. शहरातील मेहरुण तलाव शिवारात एका इमारतीचे काम सुरु आहे. बुधवारी ८ मे रोजी सकाळी साडेनऊ वाजेच्या समारास इमारतीच्या ९ व्या मजल्यावर बंडू सोनवणे हे सेटींगचे काम करत होते. हे काम करत असताना, अचानक त्यांचा तोल गेला. ते थेट नवव्या मजल्यावरुन खाली कोसळल्याने गंभीर जखमी झाले होते. ही घटना त्यांचसोबत असलेल्या इतर मजूरांच्या लक्षात येताच त्यांनी लागलीच बंडू सोनवणे यांना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. या ठिकाणी डॉक्टरांनी तपासणीअंती त्यांना मयत घोषीत केले. बंडू वना सोनवणे यांच्या पश्चात पत्न मुलगा व तीन विवाहित मुली आहेत. एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.




















