• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव जळगाव ग्रामीण

नेत्यांसह कार्यकर्ते संभ्रमात : सुरेशदादादांच्या निर्णयावर बदलणार विजयाचे गणित !

जळगाव लोकसभेला सुरेशदादा जैन कुणाला देणार आशीर्वाद ?

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
May 10, 2024
in जळगाव ग्रामीण, जळगाव, ब्रेकिंग, राजकीय, राज्य
0
नेत्यांसह कार्यकर्ते संभ्रमात : सुरेशदादादांच्या निर्णयावर बदलणार विजयाचे गणित !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | राजकीय विशेष

लोकसभा निवडणुकीसाठी जळगाव जिल्ह्यात सर्वच पक्षाच्या नेत्यांचा प्रचार जोरदार सुरु असून जिल्ह्यात मागील आठ दिवसात दिग्गज नेत्यांच्या सभा देखील होवून गेल्या यात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस, शरद पवार, जयंत पाटील यांच्यासह प्रत्येक पक्ष आपल्या नेत्याच्या सभा घेवून जिल्ह्यातील राजकारण तापवित आहे. पण मतदानाचा दिवस येत्या चार दिवसावर असतांना जळगाव जिल्ह्याच्या राजकारणात मोठा निर्णय माजी मंत्री सुरेशदादा जैन यांनी घेतल्याने जळगाव लोकसभा मतदार संघाच्या विजयाचे गणित बदलू शकते का ? याबाबत लोकसभा मतदार संघात जोरदार चर्चा सुरु आहे.

दादांच्या राजीनामा पत्रात ?
माजी मंत्री तथा शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुरेशदादा जैन यांनी सक्रिय राजकारणातून निवृत्ती जाहीर केली असून त्यांनी बुधवारी उद्धव ठाकरेंच्या सेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवला. भविष्यात राष्ट्र, राज्य, जिल्हा व जळगाव शहराच्या सर्वांगीण विकासासाठी मार्गदर्शक भूमिकेत राहणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. गुरुवारी जारी करण्यात आलेल्या एका प्रसिद्धिपत्रकाद्वारे सुरेशदादा जैन यांनी ही घोषणा केली. त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करून, शिवसैनिकांबद्दल प्रेम व आदर व्यक्त केले आहे. सुरेशदादा जैन हे १९७४ पासून राजकारणात होते. ते १९८० मध्ये पहिल्यांदा आमदार झाले आणि सलग ३४ वर्षे आणि नऊ वेळा आमदार होते. ते १९८५ मध्ये जळगावचे नगराध्यक्ष, तर १९९५ मध्ये राज्यातील युती सरकारमध्ये मंत्री झाले. त्यांच्या नेतृत्वात झालेला जळगाव शहराचा सर्वांगीण विकास, विशेषतः बीओटी तत्त्वावर बांधलेली संकुले, गोरगरिबांसाठी घरकुले आदी कामांमुळे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे प्रभावित झाले होते.

जळगाव जिल्ह्यात माजी मंत्री सुरेशदादा जैन हे नेहमीच किंगमेकरच्या भूमिकेत असल्याने जळगाव लोकसभा निवडणुकीचा प्रचार दोन दिवस असतांना दादांनी घेतलेल्या निर्णयाने कोणत्या तरी एका उमेदवाराला फायदा तर दुसऱ्या उमेदवाराला मोठा फटका देखील बसू शकतो. जिल्ह्यातील हजारो नेत्यांसह कार्यकर्ते दादांच्या शब्दाला मान देणारे असल्याने दादा काय निर्णय घेतील याकडे आता जिल्ह्यातील नेत्यांसह कार्यकर्त्यांचे लक्ष लागून आहे.

दादांचे कट्टर समर्थक ठाकरे गटात
जळगाव शहराच्या राजकारणात आज देखील माजी मंत्री सुरेशदादा जैन यांचा शब्द अंतिम समजला जातो तर याच राजकारणातील दिग्गज नेते दादांचे कट्टर समर्थक असून ते आज ठाकरे गटाच्या उमेदवाराचा प्रचार करीत आहे. पण दादांची भूमिका काय असणार यावर आता निवडणुकीचा प्रचार ठरू शकतो. दादांनी घेतलेल्या या निर्णयामुळे अनेकांना कोणत्या उमेदवाराचा प्रचार करावा, हे मात्र संकट पडले आहे. मात्र दादा काय निर्णय घेतील याकडे जळगाव जिल्हावासीयांचे लक्ष लागून आहे.

दादा कुणाला देणार आशीर्वाद ?
जळगाव लोकसभा मतदार संघात भाजप व ठाकरे गटात जोरदार लढत दिसत असून मतदानाच्या चार दिवसापूर्वीच माजी मंत्री सुरेशदादा जैन यांनी घेतलेल्या निर्णयामुळे आता दादा कुणाला आशीर्वाद देणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Related Posts

बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !
क्राईम

‘रिचार्ज अपडेट’च्या आमिषाने ७४ वर्षीय वृद्धाला गंडा; १० लाख लंपास!

September 13, 2026
जळगावातून सोन्याचे दागिने घेऊन व्यापारी पसार : सुवर्ण कारागिराला तब्बल २ कोटी ४५ लाखांचा चुना !
क्राईम

जुन्या वादातून तरुणावर जीवघेणा हल्ला !

September 13, 2026
साई मोरया गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी केतन पाटील व सचिवपदी प्रतीक सोनवणे !
जळगाव

साई मोरया गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी केतन पाटील व सचिवपदी प्रतीक सोनवणे !

September 12, 2026
कविवर्य ना. धो. महानोर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आंतरशालेय मराठी कविता वाचन स्पर्धा उत्साहात
जळगाव ग्रामीण

कविवर्य ना. धो. महानोर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आंतरशालेय मराठी कविता वाचन स्पर्धा उत्साहात

September 12, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त
क्राईम

१८ वर्षीय तरुणाच्या खून प्रकरणात संशयित आरोपीला जंगलातून अटक !

September 12, 2026
धक्कादायक : खडके चाळमध्ये १२ वर्षीय चिमुकल्याने घेतला टोकाचा निर्णय !
क्राईम

धक्कादायक : खडके चाळमध्ये १२ वर्षीय चिमुकल्याने घेतला टोकाचा निर्णय !

September 12, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !

‘रिचार्ज अपडेट’च्या आमिषाने ७४ वर्षीय वृद्धाला गंडा; १० लाख लंपास!

September 13, 2026
जळगावातून सोन्याचे दागिने घेऊन व्यापारी पसार : सुवर्ण कारागिराला तब्बल २ कोटी ४५ लाखांचा चुना !

जुन्या वादातून तरुणावर जीवघेणा हल्ला !

September 13, 2026
साई मोरया गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी केतन पाटील व सचिवपदी प्रतीक सोनवणे !

साई मोरया गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी केतन पाटील व सचिवपदी प्रतीक सोनवणे !

September 12, 2026
कविवर्य ना. धो. महानोर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आंतरशालेय मराठी कविता वाचन स्पर्धा उत्साहात

कविवर्य ना. धो. महानोर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आंतरशालेय मराठी कविता वाचन स्पर्धा उत्साहात

September 12, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group