जळगाव मिरर | १९ जून २०२४
गेल्या काही वर्षापासून सोशल मिडीयावर अनेक रील व्हायरल होत असतात असाच एक रील सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होवू लागला आहे. रील तयार करण्यासाठी एका महिलेने साऱ्या मर्यादा ओलांडल्या असून, तिला ताबडतोब बेड्या ठोकाव्यात, अशी मागणी नेटकऱ्यांकडून केली जात आहे. यासंदर्भात व्हायरल झालेल्या व्हिडीओत संबंधित महिलेच्या एका हातात लहान बाळ दिसत असून, दुसऱ्या हातात तिने सिगारेट पकडली आहे. हा व्हिडीओ पाहून लोकांनी संताप व्यक्त केला आहे.
https://x.com/snehamordani/status/1802658938669703181?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1802658938669703181%7Ctwgr%5E7c379e2da74a80cf95fab271c7c91e3156446aa3%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fpudhari.news%2Fnational%2F812369%2Fwomans-smoking-video-with-child-in-hand-to-make-reel%2Far
सिगारेटचा झुरका मारल्यानंतर ती मुलासमोरच तोंडातून धूर सोडते. व्हिडीओच्या बॅकग्राऊंडला एक हिंदी गाणे लावण्यात आले आहे. या गाण्यावर ती महिला रील बनवत असल्याचे दिसून येते. पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्या दीपिका भारद्वाज यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. विशेष म्हणजे यातील बाळसुद्धा त्या महिलेचे नाही. सिगारेटमुळे बाळाच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. मात्र, त्याबद्दल या महिलेला ना खंत आहे, ना खेद.
