जळगाव मिरर | १९ जून २०२४
भावसार समाज बहुउद्देशीय संस्था संचलित भावसार ऑर्गनायझेशन ऑफ सोशल सर्विस BOSS च्या माध्यमातून राज्यस्तरीय दहावी व बारावी गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार शिर्डी येथील श्री साई गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल येथे थाटामाटात संपन्न झाला.
यावेळी राज्यातील विविध जिल्ह्यातून आपल्या पालकांसहित सहकुटुंब आले होते . कार्यक्रमाच्या सुरुवातीला सर्वांचे स्वागत व परिचय करुन देण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे चेअरमन श्री तानाजी वामनराव गोंदकर होते व कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सौ वर्षा बोंबले संभाजीनगर या होते. हिंगलाज मातेस स्मरून कार्यक्रमाची सुरुवात झाली. सुरुवातीला सर्वांचा सत्कार करण्यात आला. अध्यक्षीय भाषणात बोंदकरांनी या कार्यक्रमाची सर्वांगपरी प्रशंशा केली. त्यानंतर 90% किंवा त्यापेक्षा जास्त गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार कार्यक्रम सुरू झाला सत्कार कार्यक्रमात प्रत्येक विद्यार्थ्याला एक ट्रॉफी ,प्रशस्तीपत्र ,आणि 300 पेजेस लाँग रजिस्टर चे 6 वह्याचे बंडल , साई बाबांची पुस्तके, विष्णू सहस्त्रनाम स्तोत्रम् अश्या सर्व वस्तूंचे वाटप करण्यात आले. सौ निता सचिन भावसार (कुटे) मलकापूर यांनी सूत्र संचालन केले. मंचावर श्री भाऊराव बालमुकुंद राजकुवर पुलगाव सतीश धारस्कर वर्धा व सौ वर्षा बोंबले औरंगाबाद संस्थेचे चेअरमन गोंदेकर साहेब आणि संस्थेचे अध्यक्ष श्री कैलास भावसार उपस्थित होते . सौ. निता सचिन भावसार (कुटे)यांनी आभार प्रदर्शन केले .कार्यक्रम यशस्वी रित्या संपन्न झाला.
