जळगाव मिरर | २१ जून २०२४
पुण्यातील तरुण- तरुणींच्या स्टंटचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. नव्हे परिसरातील स्वामीनारायण मंदिराजवळचा हा व्हिडीओ असल्याचे समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, इन्स्टाग्रामवर रील बनवण्यासाठी स्टंट केल्याची माहिती आहे. साताऱ्यात रीलच्या नादात एका तरुणीने जीव गमावल्याची घटना ताजी असताना आता पुण्यातील हा व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर रीलच्या आहारी डोके गहाण ठेवले आहे का ? असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. पुण्यात नन्हे परिसरात स्वामीनारायण मंदिर परिसरात एका उंच इमारतीच्या गच्चीवरून एक मुलगी आपल्या मित्राचा हात धरून लटकली. हात सुटला असता तर ती खाली पडली असती. सुदैवाने कोणतीही दुर्घटना घडली नाही.
घटनेचा व्हिडीओ अंगावर काटा आणणारा आहे. या स्टंटचे चित्रीकरण करण्यासाठी कॅमेरामनसुद्धा तिथे उपस्थित होता. कॅमेरामन वर थांबला असून तरुणीच्या या भयंकर स्टंटचा व्हिडीओ काढत आहे.
