जळगाव मिरर | २१ जून २०२४
देशातील लोकसभा निवडणुकीत यंदा राज्यात महाविकास आघाडीने जोरदार प्रचार करीत मोठे यश मिळविल्याने आता विधानसभेसाठी महाविकास आघाडीचे नेत्यांसह कार्यकर्ते चांगलेच कामाला लागले आहे. नुकतेच पुणे येथे माजी मंत्री शरद पवारांनी मोठ वक्तव्य केल्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
शरद पवार म्हणाले कि, लोकसभा निवडणुकीच्या वेळी महाविकास आघाडी टिकून राहावी, यासाठी मी दोन पावले मागे आलो असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे. आपल्याला लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपात जास्त जागा मिळायला हव्या होत्या, असेही शरद पवार यांनी म्हटले आहे. मात्र महाविकास आघाडी एकत्र राहिल्यामुळे आपल्याला लोकसभा निवडणुीत यश आले असल्याचेही शरद पवार यांनी म्हटले आहे. इतकेच नाही तर विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे निर्देश देखील शरद पवार यांनी दिले आहेत. या माध्यमातून आगामी विधानसभा निवडणुकीत जास्तीत जास्त जागा मागण्यात येणार असल्याचे संकेत देखील त्यांनी दिले आहेत.
महाविकास आघाडीची एकी कायम राहावी, यासाठी आपण दोन पावले मागे आलो होतो, असे म्हणत शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकीच्या वेळी माघार घेतल्याचे मान्य केले आहे. विधानसभा निवडणुकीच्या कामाला लागण्याचे निर्देश शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना दिले असून राज्यातील सत्ता आपल्याला ताब्यात घ्यायची असल्याचेही ते म्हणाले. लोकांची जास्तीत जास्त कामे करा, त्यांचे प्रश्न सोडवा, असे म्हणत सर्वांनी विधानसभा निवडणुकीच्या तयारी लागण्याचे निर्देश शरद पवारांनी दिले आहेत.
पुण्यातील निसर्ग मंगल कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या बैठकीचे आयोजित करण्यात आले होते. या बैठकीला शरद पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील, रोहित पवार, बाळासाहेब पाटील, यांच्यासह पक्षाचे सर्व नवनिर्वाचीत आठ खासदार उपस्थित होते. मात्र, शरद पवार यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. त्यांचे हे वक्तव्य पाहता आगामी विधानसभा निवडणुकीत मविआच्या जागावाटपात राष्ट्रवादी काँग्रेस जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घेण्यासाठी आक्रमक भूमिका घेईल, असे संकेत मिळत आहेत.
