जळगाव मिरर | २४ जून २०२४
राज्यातील नंदुरबार जिल्ह्यात नेहमीच रस्ता नसल्याने रुग्णाची मोठी हाल होण्याच्या घटना नेहमीच उघडकीस येत असतांना देखील आता पुन्हा एकदा नंदुरबारमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जिल्ह्यातील धडगांव तालुक्यात बांबूच्या झोळीत प्रस्तुतीसाठी घेऊन जात असताना आदिवासी महिलेची रस्त्यातच झाली प्रस्तुती झाली आहे. गावाकडे जाण्यासाठी रस्ता नसल्याने या महिलेला बांबूची झोडी बांधून रुग्णालयापर्यंत नेले जात होते. या घटनेचे व्हिडिओ देखील समोर आले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, अल्का आकाश पावरा असे या महिलेचे नाव आहे. सध्या त्यांच्यावर आणि नवजात बळावर नंदुरबारमधील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, रस्ता नसल्याने गावातील नागरिकांना 2 किलोमीटरचा पायी प्रवास करावा लागतो. एकीकडे प्रशासन संस्थात्मक प्रसूती वाढविण्याचे प्रयत्न करत आहे. मात्र आरोग्य सुविधेच्या अभावी रस्त्यात प्रसूती होत असल्याचे चित्र आहे.
या भागांत वेळेवर उपचार मिळाला नसल्याने अनेक वेळा लोकांना आपला जीव गमवावा लागल्याची घटना घडल्या आहे. तर अनेक रस्त्यात प्रसूती झाल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र याकडे प्रशासनाचे पूर्ण दुर्लक्ष आहे. 100 पेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या या पाड्याचा पावसाळ्यात संपर्क तुटतो. त्यामुळे गावांत रस्ता तयार करून देण्याची मागणी गावकरी करत आहेत. मात्र स्थानिक आमदार आदिवासींच्या मूळ समस्येकडे दुर्लक्ष करत असल्याचा आता आरोप ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येत आहे.