जळगाव मिरर | २ जुलै २०२४
जळगाव शहरात गेल्या काही दिवसापासून अनेक परिसरात घाणीचे साम्राज्य व पावसाळयाचे दिवस सुरु असल्याने पाऊस पडल्यावर गटारी ओव्हरफ्लो होवून वाहतात. त्यामुळे नागरीकांच्या घरात पाणी शिरते, दैनंदिन कचरा संकलन होत नाही. त्यामुळे पडलेल्या कचऱ्याची दुर्गंधी येवून विविध आजार उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही या आशयाचे निवेदन मनपाचे माजी उपमहापौर डॉ.अश्विन शांताराम सोनवणे यांनी मनपा आयुक्तांना निवेदन दिले होते. त्या निवेदनाची दखल घेत मनपा आयुक्तांनी दि.१ रोजी मनपाच्या अधिकाऱ्याना याबाबत आदेश दिले आहे. त्यामुळे जळगाव मनपाच्या अधिकारी जागे झाले आहे.
सविस्तर वृत्त असे कि, जळगाव शहरातील अनेक परिसरात गेल्या काही महिन्यापासून घाणीचे साम्राज्य व अनेक परिसरात पावसाच्या पाण्यामुळे गटारी, नाले तुडुंब भरून वाहू लागले होते. त्यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याने मनपाचे माजी उपमहापौर डॉ.अश्विन शांताराम सोनवणे यांनी मनपा आयुक्त यांना निवेदन दिले होते. त्यानंतर मनपा आयुक्तांनी आता अधिकाऱ्याना शहरातील सर्वच कामे करण्याचे आदेश दिले असून त्या पात्रात म्हटले आहे कि, शहरातील वार्डातील दैनंदिन रस्ते व गटारींची साफ सफाई करुन संपूर्ण कचरा संकलन करुन साफ सफाई कामाचा उत्तम दर्जाची होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावे शहरात कोणत्याही ठिकाणी कचरा साचलेला दिसणार नाही. तसेच सर्व सार्वजनिक शौचालये स्वच्छ असतील याची खात्री करावी. तसेच पावसाळयात डेंगूसारखे आजार होवू नये म्हणून अँबेटींग व फवारणी करण्यात यावी. ज्या वार्डात साफ सफाई झालेली नसल्याचे व कचरा साचलेला आढळल्यास संबंधीतांवर शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावीत केली जाईल याची गांभीर्याने नोंद घ्यावी. असे पत्र दिले आहे.