चाळीसगाव : प्रतिनिधी
कर्जाला कंटाळून शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना तालुक्यातील टाकळी प्र.दे. येथे आज सकाळी घडली आहे.
मिळालेली माहिती अशी की, तालुकयातील टाकळी येथील शेतकरी योगेश दिलीप पवार (वय-४०) याने बॅंकेच्या कर्जाला कंटाळून आंबा फाटा जवळील मन्याड डॅम येथे विष घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवार, २७ रोजी सकाळी घडली आहे. गावातील भाऊसाहेब हिम्मत पवार, कैलास बाबुराव देवरे, दिलीप उत्तम पवार यांना योगेश बेशुद्ध अवस्थेत मिळून आला. त्याअगोदर योगेशचा मृत्यू झाला होता. तेव्हा योगेशच्या मृतदेहाला वरील गावकऱ्यांनी खासगी वाहनाने ग्रामीण रुग्णालयात दाखल केला. त्यावेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मयत घोषित केले. योगेशच्या पाश्चात्य पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. पवार कुटुंबाच्या घरात अगोदरच अठरा विश्व दारिद्री आहे. घरातील कर्ता पुरुषच काळाच्या पडद्याआड गेल्याने गावासह परिसर सुन्न झाला आहे. तत्पूर्वी या घटनेबाबत माहिती मिळताच ग्रामीण पोलीसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. याबाबत मेहूणबारे पोलिस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू आहे.