नंदुरबार : वृत्तसंस्था
परिवारातील सदस्य लहान भावाला सर्व काही घेऊन देतात; असे लहान भावास बोलून मोठा भाऊ रागाच्या भरात काठी गावाच्या रस्त्याकडे जात होता. या दरम्यान लहान भावाने भरधाव वेगाने चार चाकी वाहन चालवून मोठ्या भावास धडक देत जागीच ठार केले. काठीचा निंबीपाडा (ता. अक्कलकुवा) येथे ही घटना घडली. याबाबत खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
तालुक्यातील अक्कलकुवा येथून जवळ असलेल्या काठीचा निंबीपाडा भागात येथे २५ मे रोजी सायंकाळी विशाल सायसिंग पावरा (वय २५) व अजय सायसिंग पावरा (वय २८) या दोन्ही भावंडांमध्ये घरात वाहन घेण्यावरून वाद झाला. अजय लहान आहे, तर विशाल मोठा भाऊ असताना घरातील सर्व कुटुंबातील सदस्य तुलाच मदत करतात. गाडीही तुलाच घेऊन दिली, असे बोलून मलाही गाडी पाहिजे अशी सूचना देत विशाल हा रागाच्या भरात घरातून निघून काठी गावाच्या रस्त्याने जाण्यासाठी निघाला.
यावेळी त्याचा लहान भाऊ विशाल याला राग आला. त्याने आपल्या मालकीची महिंद्रा मॅक्स चार चाकी वाहनाने अजय याच्या पाटलागासाठी भरधाव वेगाने वाहन चालवले. तसेच अजयला रस्त्यात गाठून मागून वाहनाने जोरदार धडक देत जागीच ठार केले. वाहनाच्या धडकेत एक गंभीर जखमी झाल्याने अजयच्या जागीच मृत्यू झाला. याबाबत त्यांचे वडील सायसिंग पावरा यांनी मोलगी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून विशाल पावरा विरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.




















