जामनेर : प्रतिनिधी
तालुक्यासह जामनेर शहरामध्ये श्री संत भीमा भोई जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. जामनेर नगरपालिका चौक येथे सकाळी जामनेर नगरीच्या नगराध्यक्ष साधना महाजन यांच्या हस्ते श्री संत भीमा भोई यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.
यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, उपनगराध्यक्ष प्रा. शरद पाटील ,नगरसेवक अतिश झाल्टे ,महेंद्र बाविस्कर, गटनेते डॉ. प्रशांत भोंडे, सुहास पाटील ,दत्तू सोनवणे, सुधाकर माळी ,रवींद्र भोई,विवेक पाटील ,तेजस पाटील आदी उपस्थित होते.
यावेळी भोई समाजाचे ज्येष्ठ सिताराम भोई, रतन शिवदे, शहराध्यक्ष संजय सूर्यवंशी, उपाध्यक्ष आत्माराम शिवदे, सचिव अशोक शिवदे,युवा संघटनेचे अध्यक्ष नितीन मोरे उत्सव समिती अध्यक्ष अमोल शिवदे, राजेंद्र भारसाकळे, मोहन भोई, राजू वानखेडे, प्रदीप सूर्यवंशी, प्रल्हाद सूर्यवंशी, संजय सूर्यवंशी, दीपक भोई, पवन भोई, मनोज भोई, रोहित भोई, कैलास भोई, ललित भोई, आकाश भोई, विशाल भोई, गजानन भोई, किरण भोई, शुभम भोई, पंकज भोई, मयूर भोई,गणेश शिवदे, अनिल भोई, गोपाल भोई, राहुल भोई, श्रीकांत भोई, नितीन भोई, संतोष भोई, सुनील भोई, किरण सूर्यवंशी, भारत भोई यांनी परिश्रम घेतले.