जळगाव मिरर | ३० ऑगस्ट २०२४
जळगाव शहरात गेल्या काही महिन्यापासून शहराचे माजी उपमहापौर डॉ.अश्विन शांताराम सोनवणे यांच्या माध्यमातून शहरातील अनेक शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटपाचा कार्यक्रम सुरु आहे.
शहरातील जोशी कॉलनी परिसरातील प्रतिभाताई पाटील स्कूल येथे आज दि.२९ रोजी माजी उपमहापौर डॉ.अश्विन शांताराम सोनवणे यांच्यातर्फे सर्व विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आल्या यावेळी जळगाव शहर महानगरपालिका प्रभाग समिती सदस्य अनिल जोशी, अनिल लागवडकर, सुहास जोशी, ललित कांनडे, पवन जोशी, गोलू विधाते, राजेश्वर जोशी यांच्यासह परिसरातील नागरिक व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.