जळगाव मिरर | १० सप्टेंबर २०२४
सामाजिक एकोपा आणि जातीय सलोख्याच्या भावनांना प्रोत्साहन देतात. या भावनेचे प्रतिध्वनीत, रोजलॅण्ड इंग्लिश मि. व रोजलॅण्ड मराठी विभाग शाळेने 7 सप्टेंबर 2024 रोजी गणेश चतुर्थी साजरी केली. दीड दिवसीय गणपती बाप्पाची स्थापना करण्यात आली. त्यामध्ये सर्वधर्मीय विद्यार्थ्यांनी एकत्र येत सहभाग नोंदविला.
या सोहळ्याच्या भावनेने दोन्ही विभागाच्या सर्व विद्यार्थ्यांनी त्यांच्या कला सादर केल्या. वर्गात छोट्या गणेश मूर्ती बनवल्या. एकत्रित प्रयत्न म्हणून एक मोठी शाळू मातीची मूर्ती तयार करण्यात आली. शाळेत गणेशोत्सव आयोजित करण्याचे कारण असे की आपल्या भारतातील थोर महान पुरुष लोकमान्य टिळक यांनी ज्या हेतूसाठी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला त्यांची आठवण व जाणीव विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हावी , सामाजिक संदेश पोहचावा हा होता .
‘भजनां’सह पारंपारिक ‘आरती’ने उत्सवाची सुरुवात झाली. मराठी शिक्षकांद्वारे ‘आरती’चे प्रत्येक पैलू समजावून सांगण्यात आले. जमलेल्या विद्यार्थ्यांनी बुद्धीचे प्रतीक आणि अडथळे दूर करणारे मानले जाणारे गणपतीचे मोठ्या उत्साहाने आणि भक्तीने गायन केले. विसर्जनासाठी आलेल्या मान्यवरांचे लेझिम व ढोल ताशांनी स्वागत करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून उपआयुक्त सौ.निर्मला गायकवाड तसेच. चॅरिटी कमिशनर श्री. गाडे सर , श्री. राजू पाटील, सौ. वसुधा जोशी मॅडम, सौ. सुषमा प्रधान मॅडम मार्गदर्शक व श्री वाय.एस. नाना पाटील. यांच्या उपस्थितीत कार्यक्रम सोहळा आयोजित करण्यात आला.
दुसरीकडे कृत्रिम तलाव निर्माण करून प्रमुख पाहुण्याच्या व विद्यार्थ्याच्या हस्ते गणपती बाप्पाचे विसर्जन करण्यात आले. विसर्जन करण्यात आलेले पाणी बगीच्यामधील झाडांना घालण्यात आले. गणपती विसर्जनाची माती कुंडीत जमा करून त्यामध्ये तुळशीचे रोपे लावण्यात आली. इकोफ्रेंडली गणेशोत्सव कार्यक्रमामधून विद्यार्थ्यांना व पालकांना आपण कशा प्रकारे पर्यावरणपूरक गणेशोत्सव सण साजरा करू शकतो, हा सामाजिक संदेश शाळेतर्फे देण्यात आला. यासाठी सर्व शिक्षक , शिक्षकेतरकर्मचारी यांनी कार्यक्रमासाठी सहकार्य केले .
