जळगाव मिरर | २० सप्टेंबर २०२४
चाळीसगाव तालुक्यातील गणेशपुरातील रिंकेश मोरे या १३ वर्षीय मुलाचा बळी घेणारा नरभक्षक बिबट्या गुरुवारी रात्री आठ वाजता पिंजऱ्यात जेरबंद झाला आहे. यामुळे वनविभागासह परिसरातील नागरिकांनी देखील सुटकेचा निःश्वास सोडला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १५ रोजी गणेश – पाटणा रस्त्यावर मित्रांसमवेत धावत असतांना रिंकेश मोरे यामुलावर बिबट्याने झडप घालत त्याचा बळी घेतला होता. त्याचं दिवशी रात्रीच बिबट्या कॅमेऱ्यात कैद झाला होती. यानंतर वनविभागाने परिसरात पाच पिंज-यांसोबतचं १२ ट्रॅप कॅमेरेदेखील गुरुवारी यातील एका पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाला. गणेशपूर वलठाण शिवारात लावलेल्या पिंजऱ्यात अडकला बिबट्या बिबट्याला पकडण्यासाठी परिसरात पाच पिंजरे लावले गेले होते. यातील गणेशपूर – वलठाण शिवाराच्या मध्यभागी असलेल्या जाधव यांच्या शेतात लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या अडकला.