जळगाव ः प्रतिनिधी
शहरात गेल्या आठवड्यात 25 मे रोजी रेल्वे मालधक्यानजीक प्रेम प्रकरण भावाला सांगल्यामुळे एकाचा खून झाल्याची धक्कादायक घटना घडली होती. पोलिसांनी लागलीच याचा तपास करीत संशयित आरोपींना अटक केली होती. तर आज सकाळी पुन्हा दूसरा खून झाल्याचे उघडकीस आल्याने शहरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

शहरातील कासमवाडी परिसरातील मच्छी बाजार येथे दि.2 जून रोजीच्या मध्यरात्री 27 वर्षीय युवकाची दगडाने ठेचून खून करण्यात आल्याची घटना सकाळी उघडकीस आली आहे. मयत तरूण सागर वासुदेव पाटील (वय 27) रा.कासमवाडी असे आहे. सदर घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलिस पथक दाखल झाले होते. तत्काळ सागर याचा मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आला होता. सागर याला एका खूनाच्या गुन्ह्यात शिक्षा झालेली असून त्याला सध्या हायकोर्टातून अपीलातून जामीन मिळाला असल्याचेही वृत्त आहे. याबाबत खून कुणी व कशासाठी हे मात्र अद्याप कळू शकलेले नाही. शेवटचे वृत्त हाती आले तोवर पोलिस तपास करत आहे.