जळगाव : प्रतिनिधी
शहरातील एका परिसरात राहणारी महिला अंघोळीसाठी बाथरूममध्ये गेल्यानंतर खिडकीच्या जाळीतून तिच्याकडे वाईट नजरेने बघून विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे की, शहरातील एका भागावात ४० वर्षीय अविवाहित महिला या एकट्याच राहतात. तिची आई मुंबई येथे भावाकडे राहते. महिला ही शहरातील एका कुरीअर सेंटर येथे अकाऊंटंट म्हणून नोकरीला आहे. महिलेच्या घराजवळ विजय विनायक काळसकर (वय-६२) हा देखील राहतो. गेल्या साते ते आठ वर्षांपासून विजय काळसकर हा महिला बाथरूमध्ये अंघोळीसाठी जात असतांना बाथरूमच्या जाळीतून वाईट उद्देशाने पाहत असतो. याबाबत अनेकवेळा महिलेने त्याला समजविण्याचा प्रयत्न केला. परंतू संशयिताने महिलेच्या तोंडावर ॲसिड फेकण्याची धमकी दिली. हा प्रकार सहन न झाल्याने महिलेने शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून गुरूवार २ जून रोजी सायंकाळी ४ वाजता संशयित आरोपी विजय काळसकर याच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सर्जेराव क्षिरसागर करीत आहे.