जळगाव : प्रतिनिधी
दि ३ रोजी जळगाव मधील क्षितिज युवा फाउंडेशन व स्व.गोपिनाथरावजी मुंडे प्रतिष्ठान यांच्या तर्फे स्व.गोपिनाथरावजी मुंडे यांच्या पुण्यतिथी निमित्त केमिस्ट भवन येथे भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी महापौर सिमाताई भोळे यांच्या हस्ते गोपीनाथ मुंडे यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करुण अभिवादन करण्यात आले.
यावेळी स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महानगर अध्यक्ष अशोक लाडवंजारी, केमिस्ट संघटनेचे अध्यक्ष सुनिल भंगाळे, ग्रामपंचयात सदस्य प्रमोद घुगे, माजी.सैनिक किशोर ढाकने, निलेश (सोनी)सांगळे,भाग्येश ढाकने, भारतीय मजदुर संघटनेचे जिल्हा सरचिटनीस सचिन लाडवंजारी, किशोर वाघ, दिपक बाविस्कर, महादू सोनवणे, मिलिंद सोनवणे, आसिफ शहा बापू , क्षितिज फाउंडेशनचे अध्यक्ष गजानन वंजारी उपस्थित होते
यावेळी भूषण लाडवंजारी. , सचिन लाडवंजारी, नितिन वंजारी, शिवसेना तालुका अध्यक्ष केतन पोळ, किशोर ढांकने, गणेश यशवंत नाईक, हर्षल मुंडे, सागर सानप, क्षितिज फाउंडेशनचे अध्यक्ष गजानन वंजारी, हेमंत नाईक, तेजस वाघ, गौरव वाघ, ऋषिकेश वाघ, अक्षय मेघे, मयुर नाईक, या युवकांनी रक्तदान केले.यावेळी स्थायी समिति सभापती राजेंद्र घुगे पाटील व अशोक लाडवंजारी यांनी दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणीना दुजोरा दिला.यावेळी माधवराव गोळवलकर स्वयंसेवी रक्त केंद्र डॉक्टर लोकेश तावडे, उज्वला अमोल पाटील , सुनील अनपट, रामचंद्र पोतदार, उदय सोनवणे, अर्जुन राठोड जनसंपर्क अधिकारी, यांनी परिश्रम घेतले.यावेळी क्षितिज फाउंडेशनचे निलेश घुगे पाटील, लोकेश वाघ, जयेश पाटील, योगेश बागडे,विक्की सोनार, पंकज गांगड़े, वैभव वाघ, विजय लाड, राहुल अहिरे, अविनाश पारधे, किरण नाईक, ए.बी. 7 ग्रुपचे आकाश पाटील, विजय वाघ, महेश सोनवणे, यांनी परिश्रम घेतले.