जळगाव मिरर | ११ ऑक्टोबर २०२४
हरिविठ्ठलनगरमध्ये एका महिलेच्या घरात घुसून तिच्यावर जबरी अत्याचार केल्याची घटना बुधवारी मध्यरात्री घडली. याबाबत रामानंदनगर पोलिस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल झाला असून, संशयिताला पोलिसांनी अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हरिविठ्ठलनगर परिसरातील एका भागात २४ वर्षीय महिला आपल्या मुलांसह वास्तव्याला आहे. बुधवारी १९ रोजी मध्यरात्री ही महिला आपल्या मुलांसह झोपलेली असताना संशयित आरोपी मंगेश उर्फ मंगलदास अंबादास कोळी (वय ४०, रा. हरिविठ्ठलनगर) हा महिलेच्या घरात घुसला. त्यानंतर महिलेचे तोंड दाबून तिच्यावर अत्याचार केला. तसेच घरातून जाताना ‘कोणाला काही सांगितले, तर ठार मारण्याची धमकी दिली.