जळगाव मिरर | २६ ऑक्टोबर २०२४
जळगाव तालुक्यातील ममुराबाद गावाजवळ काहीही कारण नसतांना एकाला शिवीगाळ करत दोघांकडून लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना बुधवारी २३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेसात वाजता घडली आहे. याप्रकरणी गुरूवारी २४ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री दीड वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राधेश्याम गुलाब मोरे (वय ५६) रा. ममुराबाद ता. जळगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. बुधवारी २३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास ते घराबाहेर उभे होते. त्यावेळी गावात राहणारे रोहिदास भिल आणि ईश्वर रोहिदास भील दोन्ही राहणार. ममुराबाद ता. जळगाव यांनी काहीही कारण नसतांना शिवीगाळ करत लाकडी दांडक्याने राधेश्याम मोरे यांना बेदम मारहाण करून दुखापत केली. याप्रकरणी गुरूवारी २४ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री दीड वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात मारहाण करणारे रोहिदास भिल आणि ईश्वर रोहिदास भील दोन्ही राहणार. ममुराबाद ता. जळगाव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस नाईक सोपान पाटील हे करीत आहे