जळगाव मिरर | ४ नोव्हेबर २०२४
राज्यात विधानसभा निवडणुकीतील उमेदवारांचा आज माघारीचा दिवस होता यात अनेक दिग्गज नेत्यांनी माघार घेतली आहे. तर काही मतदार संघात चुरशीची लढत होत असल्याचे चित्र दिसत आहे. जळगाव जिल्ह्यातील एरंडोल – पारोळा मतदार संघात यंदा अपक्ष उमेदवार डॉ.संभाजीराजे पाटील हे आपल्या उमेदवारीवर ठाम राहिले आहे.
एरंडोल,कासोदा,भडगाव, मतदार संघाचे अपक्ष उमेदवार डॉ.संभाजीराजे पाटील यांनी अफवा पसरवू नका मी उद्या पासुन दादणीत प्रचाराला सुरवात करणार असून सिलिंडर या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड मताने निवडून दया असे आवाहन आपल्या मतदारसंघात करण्यात आलेले आहे,
डॉ.संभाजीराजे पाटील यांचे उमेदवारी म्हणजे सर्व साधारण जनतेची साथ व मतदार संघाचा विकास हेच ध्येय डोळ्यासमोर ठेवून उद्यापासून आपल्या मतदार संघात यावेळेस निश्चित बदल होणार,व मतदार संघाचा विकास होणार,या ध्येयाने सर्वसाधारण जनतेसमोर आपली उमेदवारी घोषित केले आहे.