• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

जळगावातील स्फोट प्रकरण : वडिलांपाठोपाठ मुलाचा मृत्यू

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
November 12, 2024
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण, ब्रेकिंग
0
जळगावातील स्फोट प्रकरण : वडिलांपाठोपाठ मुलाचा मृत्यू
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर  | १२ नोव्हेबर २०२४

शहरातील ईच्छादेवी पोलीस चौकी शेजारी सुरु असलेल्या अवैध गॅस रिफिलींग सेंटरवर वाहनात गॅस भरतांना सिलींडरचा स्फोट झाला होता. यामध्ये दोन दिवसांपुर्वी वाहनात बसलेल्या भरत दालवाला यांचा मृत्यू झाला होता. वडीलांपाठोपाठ दोन दिवसात सुरज भरत दालवाला (वय २३, रा. यमुना नगर) या तरुणाचा देखील मृत्यू झाला. ही घटना सोमवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली. स्फोटातील गंभीर जखमींपैकी चौथा बळी गेल्यानंतर देखील जिल्हा प्रशासनाने कुठलीही दखल घेतल्याने नातेवाईकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील यमुना नगरात राहणारे भरत दालवाले यांच्याकडे पुण्याहून नातेवाईक आले होते. त्यांना घेवून ते अमळनेर येथील मंगळग्रह मंदिरावर जाण्यासाठी त्यांनी वाघ नगरातील संदीप शेजवळ यांचे वाहन बुक केले. दि. ५ रोजी दुपारच्या सुमारास ते अमळनेरला जात असतासंना वाहन चालक ईच्छदेवी पोलीस चौकीशेजारी असलेल्या गॅस रिफिलींग सेंटवर वाहनात गॅस भरण्यासाठी थांबला. दरम्यान, गॅस सिलींडरचा स्फोट होवून वाहनात बसलेल्या दालवाले कुटुंबियांसह दहा जण गंभीर जखमी झाले होते. यातील गंभीर जखमी झालेल्या सुरज याच्यावर जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते. त्याच्यावर उपचार सुरु असतांना सोमवारी रात्रीच्या सुमारास त्याची प्राणज्योत मालवली.

दालवाले कुटुंबियांची आर्थीक परिस्थिती अत्यंत हालाखीची होती. भरत दालवाले हे मजूरी करीत होते तर त्यांचा मोठा मुलगा सुरज हा शहरातील कापड दुकानात बिलींगचे काम करुन वडीलांना हातभार लावित होता. गॅस सिलींडरच्या स्फोटात त्यांचे संपुर्ण कुटुंब गंभीररित्या भाजले गेले होते. दोन दिवसांपूर्वीच शनिवारी भरत दालवाले यांचा मृत्यू झाला होता, आता त्यांच्या मुलाचे निधन झाल्याने दालवाले कुटुंबियांवर दुःखा डोंगर कोसळला आहे.

अवैधरित्या सुरु असलेल्या गॅस सिलींडर स्फोटात चार जणांचे बळी गेले असून अजून सहा जणांवर पुणेसह खासगी व जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहे. यातील पाच जणांची प्रकृती देखील चिंताजनक आहे. एवढी मोठी घटना घडून देखील जिल्हा प्रशासनासह पोलीस दलाकडून मयतांच्या कुटुंबियांची अद्याप दखल घेतली न गेल्याने नातेवाईकांनी प्रशासनाविरुद्ध संताप व्यक्त केला.

गैस सिलींडरच्या स्फोटात गॅस रिफिलींग सेंटवर काम करणारा दानिशचा मृत्यू झाला. त्यानंतर पैशांमुळे खासगी रुग्णालयातून जिल्हा रुग्णालयात दाखल केलेल्या भरत दालवाले यांचा तर तिसरा मृत्यू हा वाहन चालक संदीप शेजवळ यांचा झाला. त्यानंतर आता सुरजचा देखील उपचार सुरु असतांना प्राणज्योत मालवल्याने सुरज हा स्फोटातील चौथा बळी ठरला

Related Posts

साई मोरया गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी केतन पाटील व सचिवपदी प्रतीक सोनवणे !
जळगाव

साई मोरया गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी केतन पाटील व सचिवपदी प्रतीक सोनवणे !

September 12, 2026
कविवर्य ना. धो. महानोर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आंतरशालेय मराठी कविता वाचन स्पर्धा उत्साहात
जळगाव ग्रामीण

कविवर्य ना. धो. महानोर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आंतरशालेय मराठी कविता वाचन स्पर्धा उत्साहात

September 12, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त
क्राईम

१८ वर्षीय तरुणाच्या खून प्रकरणात संशयित आरोपीला जंगलातून अटक !

September 12, 2026
धक्कादायक : खडके चाळमध्ये १२ वर्षीय चिमुकल्याने घेतला टोकाचा निर्णय !
क्राईम

धक्कादायक : खडके चाळमध्ये १२ वर्षीय चिमुकल्याने घेतला टोकाचा निर्णय !

September 12, 2026
असंख्य भाविकांनी घेतली परम पवित्र भव्य महारुद्र पूजा पूर्णाहुतीची अनुभूती !
जळगाव

असंख्य भाविकांनी घेतली परम पवित्र भव्य महारुद्र पूजा पूर्णाहुतीची अनुभूती !

September 12, 2026
भूषण हंसकरांची कॅमेऱ्याची नजर ठरली अव्वल; ‘विश्वासाची लेन्स’मध्ये दोन श्रेणींत प्रथम क्रमांक : मंत्र्यांनी केला सन्मान !
क्राईम

भूषण हंसकरांची कॅमेऱ्याची नजर ठरली अव्वल; ‘विश्वासाची लेन्स’मध्ये दोन श्रेणींत प्रथम क्रमांक : मंत्र्यांनी केला सन्मान !

September 12, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
साई मोरया गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी केतन पाटील व सचिवपदी प्रतीक सोनवणे !

साई मोरया गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी केतन पाटील व सचिवपदी प्रतीक सोनवणे !

September 12, 2026
कविवर्य ना. धो. महानोर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आंतरशालेय मराठी कविता वाचन स्पर्धा उत्साहात

कविवर्य ना. धो. महानोर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आंतरशालेय मराठी कविता वाचन स्पर्धा उत्साहात

September 12, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त

१८ वर्षीय तरुणाच्या खून प्रकरणात संशयित आरोपीला जंगलातून अटक !

September 12, 2026
धक्कादायक : खडके चाळमध्ये १२ वर्षीय चिमुकल्याने घेतला टोकाचा निर्णय !

धक्कादायक : खडके चाळमध्ये १२ वर्षीय चिमुकल्याने घेतला टोकाचा निर्णय !

September 12, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group