जळगाव मिरर | ३ डिसेंबर २०२४
जळगांव शहर महानगरपालिकेच्या आस्थापना सुचीवरील १०० ते १५० कायम सफाई कर्मचारी यांचा अद्यापही ७ वा वेतन फरकाची रक्कम अद्यापही अदा करण्यात आलेली नाही. तसेच याबाबतचे आदेश मा. आयुक्त महोदयांनी काढलेले असतांना देखील काही कामचुकार व दिरंगाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे सदरचे सफाई कर्मचाऱ्यांना फरकाच्या रक्कमेपासुन वंचित राहावे लागत आहे.
आयुक्त महाशांनी काढलेल्या आदेशानुसार पहिल्या टप्याची ५०% रक्कम दिवाळीपूर्वी अदा करायची होती. तरी देखील कामात कामचुकारपणा केल्यामुळे व आयुक्तांच्या आदेशाचे पालनही न केल्याने संबंधितांनी कठोर कारवाई का करण्यात आलेली नाही असा प्रश्न कर्मचाऱ्यांना भेडसावत आहे. तसेच ते अद्यापही या लाभापासून वंचितच राहिलेले आहे. तरी महाशयास आपणास नम्रपणे निवेदन आहे की, जे सफाई कर्मचारी सातवा वेतन फरकापासुन वंचित राहिलेले आहेत त्यांची तातडीने अदा करण्यात यावी, व कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा, अशी विनंती आपणांस सदरचे निवेदनाद्वारे करीत आहे.