जळगाव ः प्रतिनिधी
जळगाव जिल्ह्यात प्रत्येक संस्थांवर शिवेसेनेची सत्ता मिळविण्यात जिल्ह्याचे पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांनी कुठलीही कसर सोडली नाही, त्यामुळे मनपापासून ते धरणगावच्या नगरपालिकेपर्यंत शिवसेनेचीच सत्ता आहे. मात्र कालपासून सुरु असलेल्या नाराजी बंडामध्ये ना.गुलाबराव पाटलांचे तीन शिलेदार हे एकनाथ शिंदे यांच्या गळाला लागले आहेत.
जिल्ह्यात शिवसेना वाढविण्यासाठी ना.गुलाबराव पाटील यांनी अपार परिश्रमाने शिवसेना वाढविली व विरोधातून सत्तेमध्ये ही शिवसेनेला बसविले परंतु गेल्या दोन दिवसापासून राज्यात शिवसेनेचे महत्वाचे नेते एकनाथ शिंदे यांनी नाराजी नाट्य राज्यासह देश पाहत आहे. त्यानंतर शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी हे नाराज आमदारांची मनधरणी करण्यासाठी सुरत येथे काल सायंकाळी गेले होते. परंतु ते सुध्दा शिंदे यांचे मनधरणीत कमी पडले आहे. त्यामुळे काल रात्री एकनाथ शिंदे यांनी सुरतमधील सर्वच आमदारांना घेवून आसाममधील गुवाहाटी येथे रात्रीच रवाना केले.
ना.पाटलांचे हे तीन शिलेदार
जिल्ह्यात ना.गुलाबराव पाटलांनी कार्यकर्त्यांनाही आमदार केले आहे. परंतु त्याच कार्यकर्त्यांनी शिवसेनेच्या एकनाथ शिंदे यांच्यासोबत हातमिळवणी करून शिवसेनेच्या पक्षासह नेत्यांना दगा दिल्याने कार्यकर्त्यांचे मात्र चांगलेच खच्चीकरण झाले आहे. या शिलेदारांमध्ये पाचोऱ्याचे आ.किशोर पाटील, चोपड्याचे आ.लता चंद्रकांत सोनवणे तर पारोळ्याचे आ.चिमणराव पाटील हे ही विमानतळावर पत्रकार परिषदेत दिसून आले. त्यामुळे ना.गुलाबराव पाटलांनाही याचा जब्बर धक्का बसला आहे.




















