मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सत्तानाट्यासंदर्भात फेसबुक लाईव्हद्वारे संवाद साधला. राज्यातील जनतेशी संवाद साधण्याचा निर्णय घेत आपली भूमिका स्पष्ट केली.
माझा आवाज कमी असेल तर तो करोनाचा परिणाम आहे. बोलण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत, मी बोलणार आहे. करोनासारख्या भयानक संकटाशी आपण लढलो. मला प्रशासन माहिती नव्हती, मात्र येत्या दोन तीन महिन्यात करोना आला, आपण त्याला तोंड दिलं. सुरुवातीच्या पहिल्या काही महिन्यांमध्ये जो सर्व्हे आला त्यामध्ये पहिल्या पाच मुख्यमंत्र्यांमध्ये माझा समावेश होता, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
गेल्या काही दिवसांपासून काही विषय प्रसारमाध्यमांतून समोर येत होते. मुख्यमंत्री भेटत नव्हते हे काही दिवसांपर्यंत खरं होतं. माझी शस्त्रक्रिया झाल्यानंतरच्या दोन तीन महिन्यानंतर मी कुणाला भेटत नव्हतो. मात्र, आता मी अनेकांना भेटत होतो. रुग्णालयातून दुसऱ्या खोलीतून ऑनलाईन बैठक घेतली, असं उद्धव ठाकरेंनी सांगितंल.
शिवसेना आणि हिंदुत्व एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यासह अयोध्येला जाऊन आले. विधानसभेत हिंदुत्वावर बोलणारा मी पहिला मुख्यमंत्री आहेत. बाळासाहेब ठाकरे यांचं निधन २०१२ मध्ये निधन झाल्यानंतर आपण २०१४ मध्ये एकटे लढलो होतो. प्रतिकूल स्थितीत आपण ६३ जण निवडून आणले. त्यावेळी जे मंत्री झाले ते आता देखील मंत्री आहेत. गेल्या अडीच वर्षांपासून मी मुख्यमंत्री आहे. आता देखील काही जण मंत्री आहेत, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
