जळगाव मिरर | २१ डिसेंबर २०२४
जामनेर तालुक्यातील पहुर ते शेंदुर्णी रस्त्यावर कापसाने भरलेल्या ट्रकने डिव्हायडरला जबर धडक दिल्याने ट्रक उलटल्याची घटना १९ रोजी रात्री घडली. यात सुर्दैवाने जिवीतहानी झाली नसली तरी ट्रक व कापसाचे मोठे नुकसान झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पहूर ते शेंदुर्णी महामार्गावरील पहूर येथून २ किलोमीटर अंतरावर असलेल्या श्रीक्षेत्र संगमेश्वर महादेव मंदिरासमोर १९ रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास शेंदुर्णीकडून पहूरकडे कापसाने भरलेला ट्रक (एमएच २८, बीबी ५९९२) ने डिव्हायडरला जबर धडक दिली. त्यानंतर हा ट्रक महामार्गावरच उलटला. सुदैवाने या अपघातात कुठलीही जीवितहानी झालेली नाही. परंतु, ट्रक व कापसाचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, जेथे अपघात घडला नेमके त्याच ठिकाणाहून डिव्हायडरला सुरुवात झाली आहे. या डिव्हायडरची साईज लहान असल्याने वाहन चालकांना तो समजत नसल्याने या ठिकाणी नेहमीच अपघात होत असतात.