जळगाव मिरर | ८ जानेवारी २०२५
अभिनेत्री तेजश्री प्रधान गेल्या काही दिवसांपासून स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेत मुख्य भूमिका साकारत होती. यामध्ये तिने साकारलेल्या मुक्ताच्या भूमिकेला प्रेक्षकांची पसंती मिळत होती. मात्र, आता अचानक तिने या मालिकेला रामराम केला आहे, आणि तिच्या जागी दुसरी अभिनेत्री प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तेजश्रीने मालिका का सोडली, याबद्दल अनेक चाहत्यांचे मनात प्रश्न निर्माण झाले आहेत.
तेजश्रीने आपल्या इन्स्टाग्रामवर काही फोटो पोस्ट केले आहेत. एक फोटो साडीमध्ये पोस्ट करत, कॅप्शनमध्ये तिने लिहिले, “चिअर्स.. कधीकधी तुम्हाला बाहेर पडावं लागतं. तुमचं महत्त्व जाणून घ्या आणि तुमच्या अस्तित्वाचा आदर करा. कारण तुमच्यासाठी ते इतर कोणीही करणार नाही.” हॅशटॅगमध्ये तिने लिहिलं, “तुम्ही ज्याचे पात्र आहात त्यापेक्षा कमी गोष्टींसाठी अजिबात तडजोड करू नका”, “तुम्ही महत्त्वाचे आहात”, “देवाकडे तुमच्यासाठी नेहमीच प्लॅन तयार असतो”, “हॅपी लाइफ”.
तेजश्रीच्या या पोस्टवर सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमठल्या आहेत. एकाने लिहिलं, “प्लीज प्रेमाची गोष्ट ही मालिका सोडू नकोस. तुम्ही आणि सागरचं जुळलेलं जोड तुम्ही गेल्यावर आम्हाला पाहायला मिळणार नाही. आम्ही तुमचं काम खूप आवडतं, तुमच्यावर प्रेम करतो.” दुसऱ्याने म्हटलं, “प्रेमाची गोष्ट आता पहिल्यासारखी राहिलेली नाही. तुम्ही या मालिकेतून बाहेर पडून योग्य निर्णय घेतला.” काही नेटकऱ्यांनी मात्र ‘का?’ असा सवालही केला आहे.