जळगाव मिरर | ९ जानेवारी २०२५
हिंदू धर्मात एकादशी व्रताला अत्यंत महत्व दिलं जातं. या दिवशी श्री विष्णूंची पूजा, उपवास आणि आराधना केली जाते. प्रत्येक महिन्यात एकादशी तिथी दोन वेळा साजरी केली जाते – कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्षात. सध्या पौष महिना सुरू असून, याच महिन्यात ‘वैकुंठ एकादशी’ व्रत साजरा केला जातो, ज्याला ‘पुत्रदा एकादशी’ असेही म्हटले जाते. धार्मिक मान्यतेनुसार, या एकादशीला श्री विष्णूंची पूजा केल्याने जीवनातील सर्व सुख-संपत्ती प्राप्त होते. वैकुंठ एकादशी २०२५ साठी सध्या गूगल ट्रेंड्सवर ‘वैकुंठ एकादशी २०२५’ हा कीवर्ड ट्रेंड होत आहे. गूगल ट्रेंड्सवरील चार्टनुसार, ‘वैकुंठ एकादशी २०२५’ या कीवर्डवर अठ्ठेचाळीस तासांत वीस हजारांपेक्षा जास्त सर्चेस झाल्या आहेत.
वैकुंठ एकादशी २०२५ शुभ मुहूर्त आणि तिथी
पंचांगानुसार, पौष महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथी ९ जानेवारी २०२५ रोजी दुपारी १२ वाजून २२ मिनिटांनी सुरू होईल. ही तिथी १० जानेवारी २०२५ रोजी सकाळी १० वाजून १९ मिनिटांपर्यंत राहील. परंतु उद्या तिथीनुसार एकादशी व्रत १० जानेवारी रोजी केलं जाईल.
शुभ वेळ
एकादशी व्रत १० जानेवारी रोजी
ब्रह्म मुहूर्त – ५:२७ AM ते ६:२१ AM
अभिजीत मुहूर्त – १२:०८ PM ते १२:५० PM
व्रताची समाप्ती
वैकुंठ एकादशीच्या व्रताची समाप्ती दुसऱ्या दिवशी, म्हणजेच ११ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ०७:१५ वाजून २१ मिनिटांपासून ०८:२१ वाजेपर्यंत होईल.