जळगाव मिरर | १४ जानेवारी २०२५
राज्यात मकर संक्रातींचा उत्साह सुरु असतांना काही ठिकाणी या सणाच्या दिवशी पंतग उडविण्याची परंपरा आहे याच परंपरेला मात्र नाशिक शहरात एका तरुणाचा जीव गेल्याचे समोर आले आहे. नाशिकच्या पाथर्डी फाटा परिसरात आज संक्रांतीच्या दिवशी दुर्देवी घटना घडली आहे. आज मकरसंक्रांतीच्या दिवशीच नायलॉन मांजाने गळा कापल्यानं तरुणावर मृत्यू ओढावला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोनू धोत्रे (वय 23) असे मृत तरुणाचे नाव आहे. दुचाकीने देवळाली गावातून आपल्या बहिणीला पाथर्डी फाटा येथे घ्यायला जात असताना नायलॉन मांजाने त्याच्या गळ्याला दुखापत झाली. त्यात जखमी तरुणाचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे दोन दिवसांपूर्वीच सोनूचे लग्न ठरले होते. मे मध्ये त्याचे लग्न होते. तो गुजरातला महापालिकेत कामाला होता, सणानिमित्त नाशिकमध्ये आपल्या घरी आला होता. जखमी सोनूला सुरुवातीला खाजगी रुग्णालयात नेण्यात आलं होतं. त्यानंतर त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवण्यात आलं. तेथे त्याच्यावर उपचार सुरु असताना त्याचा मृत्यू झाला. इंदिरानगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
