जळगाव मिरर | १३ फेब्रुवारी २०२५
शरद पवारांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कौतुक केल्याने ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी शिंदेंसह पवारांवर टीकास्त्र सोडल्याने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती. त्यामुळे सर्वच नेते आता संजय राऊत यांच्यावर टीका करत असतांना आहे.
संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केल्यानंतर आता महायुतीमधील नेत्यांकडून त्यांना प्रत्युत्तर देण्यात येत आहे. शिंदे गटाचे नेते व राज्याचे मंत्री दादा भुसे यांनी एकाच वाक्यात संजय राऊत यांना प्रत्युत्तर दिले आहे. तू फक्त जळत रहा, एवढेच मी बोलेन, असे म्हणत दादा भुसे यांनी संजय राऊत यांना प्रत्युत्तर दिले आहे. तसेच आता शिंदे गटाचे आमदार नीलेश राणे यांनी देखील संजय राऊत यांच्यावर पलटवार केला आहे.
संजय राऊत यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना नीलेश राणे म्हणाले, संजय राऊत कुठला तरी तज्ज्ञ आहे. तो माणूस सरकला आहे, दुसरे काही नाही. त्याच्यावर उत्तर नाही, असे म्हणत नीलेश राणे यांनी संजय राऊत यांच्यावर फारसे बोलणे टाळले असल्याचे दिसते. दरम्यान, दादा भुसे म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अथक कष्ट करत शून्यातून हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या आशीर्वादाने मार्गक्रमण केलेले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्काराने दिल्ली येथे शरद पवार यांच्या हस्ते गौरविण्यात आले. या गोष्टीचा महाराष्ट्राला आनंद आणि अभिमान वाटला पाहिजे.
