चोपडा : प्रतिनिधी
खानदेशाची मुलुख मैदान तोफ म्हणून ओळख असलेले,महाराष्ट्र राज्याचे माजी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या बद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्या संजय राऊत यांच्या विरोधात चोपडा शहर व तालुक्याच्या वतीने जोडेमारो आंदोलन करण्यात आले. गुलाबराव पाटील यांना माननाऱ्या व त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या विविध पक्षातील लोकांनी तसेच शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी गुलाबराव पाटलांचा सन्मानार्थ घोषणा देत शिवाजी महाराज चौक दणाणून सोडला.
यावेळी गुजर समाजाच्या वतीने देखील गुलाबराव पाटील यांच्यासाठी घोषणा देत गुलाबराव पाटील यांना समर्थन दिले आहे. शिंदे गटात सामील झालेले गुलाबराव पाटील यांची भूमिका योग्य असून आजही ते निष्ठावान आहेत आणि ते आजही शिवसेनेचे सच्चे कार्यकर्ते आहेत. आणि त्यांची बाळासाहेबां प्रती असलेली निष्ठा ही तशीच असून ती आजतागायत यत्किंचितही ढासळली नाही.अशा शब्दात गुलाबराव पाटील यांचे समर्थन करण्यात आले. दोन दिवसापूर्वी बेताल वक्तव्य करणाऱ्या संजय राऊत यांचा निषेध करून त्यांच्या फोटोला जोडे मारण्यात आले. वेळीच शहर पोलीस स्टेशनच्या मध्यस्थीने निषेध मोर्चाला आवर घालण्यात आली.
गुलाबराव पाटील यांच्याबद्दल राऊत यांनी जी भाषा वापरली म्हणून त्यांच्यावर कडक कारवाई व्हावी यासाठी चोपडा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल व्हावा, म्हणून पोलीस निरीक्षक यांना निवेदन देखील देण्यात आले आहे.यावेळी जळगाव जिल्हा दोडे गुर्जर विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष चंद्रशेखर पाटील यांनी देखील पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या कार्यबदल माहिती देऊन संजय राऊत याच्यावर टीकेचे बाण सोडले होते.
संजय राऊत याचा निषेध व्यक्त करण्यासाठी आज छत्रपती शिवाजी महाराज चौकात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे समर्थक म्हणून दोडे गुर्जर संस्थांनचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर पाटील,शिवसेनेचे शहरप्रमुख आबा देशमुख,नरेश महाजन,माजी नगरसेवक राजाराम पाटील,महेश पवार,महेंद्र धनगर,विधानसभा क्षेत्रप्रमुख विकास पाटील,डॉ. पारस पाटील,दोडे गुर्जर समाजाचे विश्वस्त प्रवीण पाटील,डी.बी.पाटील,निश्चल पाटील,धुळे जिल्हा परिषद सदस्य प्रा.संजय पाटील,वीर गुजर महासभेचे विजयसिग गुर्जर, चहार्डी माजी सरपंच अशोक पाटील,चहार्डी उपसरपंच पिंटू कोळी,एमआयडीसी चे संचालक नरेंद्र पाटील,अनुराग पाटील, खेडीभोकरी येथील रणछोड पाटील,अनिल पाटील,शेतकी संघाचे चेअरमन दुर्गादास पाटील,माजी संचालक रमेश पाटील,राजेंद्र पाटील,उपसरपंच राधेश्याम पाटील,निंमगव्हान उपसरपंच देवानंद पाटील,भरत देशमुख, विजय देशमुख, युवा सेना तालुका प्रमुख गोपाळ चौधरी,तुषार पाटील,कुरवेलचे माजी सरपंच अशोक पाटील,विजय पाटील,सुनील पाटील,शिरपूर येथील निवृत्ती पाटील,गरताड चे माजी सरपंच नितीन पाटील,प्रताप पाटील,वराड चे माजी सरपंच सुनील महाजन,राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे श्याम सोनार,चोसाकाचे माजी संचालक रमेश जे पाटील,वढोदा येथील सुनील पाटील,राहुल पाटील,तुषार पाटील,बबलू पालिवाल,प्रताप पाटील ,तांदलवाडी येथील राजेंद्र पाटील यासह शेकडोच्या संख्येने सर्व जाती धर्मातील समाज बांधव उपस्थित होते.




















