जळगाव मिरर | २३ फेब्रुवारी २०२५
राज्यातील भाजपच्या नेत्या व माजी महिला खा.नवनीत राणा गेल्या काही वर्षापासून आपल्या विधानाने नेहमीच चर्चेत येत होत्या आणखी आता त्या एका वक्तव्यावरून अडचणीत सापडण्याची मोठी शक्यता आहे. हैदराबाद कोर्टाने नवनीत राणा यांना समन्स बजावला आहे. एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांना धमकी दिल्या प्रकरणात नवनीत राणा यांना कोर्टाने ही नोटिस बजावली आहे.
तुम्हाला 15 मिनिटे लागत असतील तर आम्हाला फक्त 15 सेकंदच लागतील, असे आव्हान नवनीत राणा यांनी ओवैसी बंधूंना नाव न घेता केले होते. याच वक्तव्याप्रकरणी हैदराबाद न्यायालयाने नवनीत राणांना समन्स पाठवला आहे. शिवाय येत्या 28 फेब्रुवारीला न्यायालयात हजर राहण्याचेही आदेश देण्यात आले आहे. आता नवनीत राणा कोर्टात हजर राहणार का? हे पहावे लागणार आहे.
नेमके प्रकरण काय?
नवनीत राण यांनी हैदराबादमध्ये भाजपच्या उमेदवार माधवी लता यांच्यासाठी 8 मे 2024 रोजी प्रचार सभा घेतली होती. त्यामध्ये बोलताना नवनीत राणा यांनी थेट असदुद्दीन ओवैसींवर निशाणा साधला. 2013 मध्ये अकबरुद्दीन ओवैसी यांनी 15 मिनिटांसाठी पोलिसांना बाजूला करा, असे वक्तव्य केले होते. त्या 15 मिनिटांच्या विधानावर प्रत्युत्तर देताना आम्हाला 15 सेकंद पुरेशी आहेत. पोलिसांना 15 सेकंदांसाठी हटवा. कोण कुठून आले आणि कुठून गेले हे दोन्ही भावांना कळणार नाही, असे विधान नवनीत राणा यांनी केले होते. नवनीत राणांच्या याच वक्तव्याची दखल निवडणूक अधिकाऱ्यांनी घेतली आणि त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. आता याच 15 सेकंदाच्या वक्तव्य विरोधात नवनीत राणा यांना समन्स आला असून येत्या 28 फेब्रुवारी रोजी हैदराबाद न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
दरम्यान, नवनीत राणा यांना त्यावेळी या वक्तव्याबाबत विचारले असता, मी माझ्या वक्तव्यावर ठाम असल्याचे त्यांनी सांगितले होते. ज्या देशाचे नावच हिंदुस्थान आहे, त्या देशामध्ये हे पाकिस्तानच्या आवलादी येऊन आम्हाला धमकी देत असतील. तर आम्ही उत्तर देण्यास ठाम आहेत. मी माझ्या त्या वक्तव्यावर अजूनही ठाम आहे. तुम्हाला 15 मिनिटे लागत असतील तर आम्हाला फक्त 15 सेकंदच लागतील, असे नवनीत राणा म्हणाल्या होत्या.