जळगाव मिरर | ११ मार्च २०२५
पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतातील फुटीरतावादी दहशतवाद्यांनी मंगळवारी सुमारे ४०० प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या प्रवासी ट्रेनवर हल्ला केला, ज्यामध्ये ट्रेन चालक जखमी झाला, असे वृत्त ‘रॉयटर्स’ या वृत्तसंस्थेने दिले आहे. दहशतवाद्यांनी एक निवेदन जारी करून दावा केला आहे की, जाफर एक्सप्रेसचा ताबा घेतला आहे. चकमकीत सहा सैनिक ठार झाले असून, १०० हून अधिक प्रवाशांना ओलीस ठेवण्यात आले आहे.
रेल्वे पाकिस्तानच्या नैऋत्य बलुचिस्तान प्रांतातील क्वेटा येथून खैबर पख्तूनख्वा येथील पेशावरला जात होती. यावेळी असताना दहशतवाद्यांनी तिच्यावर गोळीबार केला. बलुचिस्तान लिबरेशन आर्मी (बीएलए) या दहशतवादी फुटीरतावादी गटाने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांसह ट्रेनमधून अनेकांना ओलीस ठेवल्याचा दावा केला आहे.
रेल्वे नियंत्रक मुहम्मद काशिफ यांनी म्हटलं आहे की, नऊ डब्यांचा समावेश असलेल्या या ट्रेनमध्ये सुमारे ५०० प्रवासी होते. बोगदा क्रमांक ८ मध्ये सशस्त्र लोकांनी ट्रेन थांबवली. प्रवासी आणि कर्मचाऱ्यांशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू आहेत, ही घटना संभाव्य दहशतवादी घटना असू शकते, असेही त्यांनी म्हटले आहे.
रेल्वे अधिकाऱ्यांनी ‘रॉयटर्स’ला सांगितले की, जाफर एक्सप्रेस पाकिस्तानच्या नैऋत्य बलुचिस्तान प्रांतातील क्वेटा येथून खैबर पख्तूनख्वा येथील पेशावरला जात असताना तिच्यावर गोळीबार झाला. दरम्यान, बलुचिस्तानवादी गट बलुचिस्तान लिबरेशन आर्मी (बीएलए) ने म्हटलं आहे की, अपहरणकर्त्यांमध्ये पाकिस्तानी लष्करी कर्मचारी आणि इतर सुरक्षा संस्थांचे सदस्य होते. अपहरणकर्त्यांमध्ये पाकिस्तानी लष्कर, पोलिस, दहशतवादविरोधी दल (एटीएफ) आणि इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजेंस (आयएसआय) चे सक्रिय कर्तव्य बजावणारे कर्मचारी आहेत. जे सर्वजण पंजाबला जात होते,” असे निवेदनात म्हटले आहे.
फुटीरतावादी बलुचिस्तान लिबरेशन आर्मीच्या दहशतवाद्यांनी दावा केला की, त्यांनी जाफर एक्सप्रेसने प्रवास करणार्या महिला, मुले आणि बलुचिस्तान प्रवाशांना सोडले आहे, जेणेकरून उर्वरित सर्व ओलीस पाकिस्तानी सैन्याचे कर्मचारी आहेत याची खात्री होईल.दरम्यान, बलुचिस्तानमधील रेल्वे विभागाने अद्याप मृतांची संख्या आणि ओलिसांच्या स्थितीची पुष्टी केलेली नाही. घटनास्थळी सुरक्षा दलाचे कर्मचारी पोहचले आहेत.