जळगाव : प्रतिनिधी
शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे हे आमदारांसह ते मुंबई येथे येत आहेत. तर दुसरीकडे मुख्यमंत्री ठाकरे हे राजीनामा नाट्य सुरू असतानाच जळगाव मनपातील बंडखोर नगरसेवकांनी नेते एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देऊन खा. श्रीकांत शिंदे यांची भेट घेऊन पाठींब्याचे पत्र दिल्याने जळगावतही राजकारण तापल आहे.
यावेळी नगरसेवक दिलीप पोकळे, चेतन सनकत, रेश्मा काळे, प्रतिभा देशमुख, ज्योती चौव्हाण, नवनाथ दारकुंडे, हर्षल मावळे, कुंदन काळे आदी उपस्थित होते.
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून तब्बल ३९ आमदार फोडले असून गुवाहाटीत जाऊन बसले आहेत. त्यानंतर गोवा मार्गे महाराष्ट्रात येणार आहेत. एकनाथ शिंदे यांच बंड किती मोठा आहे हे आता नागरिकांना सांगायची गरज नाही. कारण शिवसेनेच्या इतिहासातल हे सगळ्यात मोठ बंड आहे. महाराष्ट्रातल्या इतिहासातही एकही पक्षात इतक मोठ झाले नाही. इतके आमदार घेऊन कधीही कोणताही गेले नव्हता. आता याचे पडसाद संपूर्ण राज्यात पडू लागले असून जळगावातील नगरसेवकांनी शिंदेंना पाठिंबा दर्शवला आहे.
आता जळगाव मनपात सत्ता बदल होईल का ? की पुन्हा बंडखोर नगरसेवक राज्यात जसा राजकीय गणित बसतील तसे गणित मनपात बसणार का ? की पुन्हा भाजपची सत्ता मनपात येणार ? याकडे सामान्य जळगावकर लक्ष लावून आहे.




















