
जळगाव मिरर | २४ एप्रिल २०२५
स्पा सेंटरच्या नावाखाली देहविक्रीचा व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरचा व्यवस्थापक राजू मधुजी जाट (रा. कलोधिया ता. पिंपरी जि. भीलवाडा, राजस्थान) याची पोलिस कोठडीची मुदत संपली. त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात येऊन कारागृहात रवानगी करण्यात आली.
सविस्तर वृत्त असे कि, शहरातील गोविंदा रिक्षा स्टॉप जवळील मार्केटमध्ये स्पा सेंटरच्या नावाखाली देहविक्री व्यवसाय सुरुहोता. या ठिकाणी दि. १८ एप्रिल रोजी कारवाई करण्यात येऊन चार महिलांची सुटका करण्यात आली होती तर व्यवस्थापक राजू जाट याला अटक करण्यात आली होती. त्याची पोलिस कोठडीची मुदत संपल्याने त्याला बुधवारी दि. २३ एप्रिल रोजी न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. स्पा सेंटरमधून सुटका करण्यात आलेल्या चार महिला सध्या शासकीय आशादीप महिला वसतिगृहात आहेत. कुटुंबीयांना त्यांचा ताबा देण्याविषयी पोलिसांना म्हणणे सादर करण्यास आदेश दिले आहे.