• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

आई-वडिलासमोर घरात घुसून तडीपार गुन्हेगाराने केली तरुणाची हत्या !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
April 27, 2025
in क्राईम, ब्रेकिंग, राजकीय, राज्य
0
आई-वडिलासमोर घरात घुसून तडीपार गुन्हेगाराने केली तरुणाची हत्या !
Share on FacebookShare on Twitter

 जळगाव मिरर | २७ एप्रिल २०२५

राज्यातील अनेक ठिकाणी गुन्हेगारी घटना घडत असतांना आता नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील शहा येथे तडीपार गुंड भय्या उर्फ प्रवीण गोरक्षनाथ कांदळकर (28) याची राहत्या घरात शिरून कोयता, कुऱ्हाड, लोखंडी रॉडने जबर मारहाण करून हत्या करण्यात आली. शनिवारी (दि. 26) सकाळी 10.30 च्या सुमारास ही घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत भय्या कांदळकरची आई विजया गोरक्षनाथ कांदळकर (44) यांच्या फिर्यादीवरून वावी पोलिसांनी 14 जणांवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. सायंकाळी उशिरा चार संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले. जुन्या वादातून कांदळकरची हत्या झाल्याची चर्चा आहे. कांदळकर गेल्या दोन वर्षांपासून तडीपार होता. तडीपारीची शिक्षा पूर्ण झाल्यानंतर तो शुक्रवारी (दि. 25) शहा येथे राहत्या घरी आला होता. शनिवारी (दि. 26) सकाळी 10.15 च्या सुमारास संशयित सौरभ गोराणे, दिनेश वाळीबा गोराणे, वाळीबा गोराणे, शरद दिगंबर गोराणे, विजय दिगंबर गोराणे, सचिन गोरख बागल, राहुल गोरख बागल, अतुल अशोक गोराणे, आबा गोटीराम गोराणे, रवींद्र गोटीराम गोराणे, वैभव विलास गोराणे, दगू साप्ते अस्तगावकर, गणेश सोनवणे, सर्जेराव रघुनाथ गोराणे (सर्व रा. शहा, ता. सिन्नर) असे जवळपास 17 ते 18 जण कांदळकरच्या घराजवळ आले होते. भय्या कांदळकर आम्हाला धमकी देतो म्हणून अगोदर घर पेटवून देण्याची धमकी दिली होती. त्यानंतर घरात लपून बसलेल्या भय्याला शोधून त्याच्या डोक्यात, मानेवर, नाका-तोंडावर, हातापायावर कोयता, कुऱ्हाड, लोखंडी रॉडने जबर मारहाण करत घराच्या बाहेर फेकून दिले. त्यानंतर टोळके घटनास्थळावरून फरार झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. मृत कांदळकरची आई विजया व वडील गोरक्षनाथ कांदळकर यांनाही मारेकऱ्यांनी मारहाण केली.

दरम्यान, कांदळकर कुटुंबीयांनी जखमी अवस्थेत भय्याला वावी पोलिस ठाण्यात व तेथून सिन्नर ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तथापि, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. रुग्णालयात कांदळकरचे मित्र, नातेवाइकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. सायंकाळी उशिरा शवविच्छेदनासाठी मृतदेह नाशिक जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला. वावीचे सहायक पोलिस निरीक्षक गणेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार शहाजी शिंदे अधिक तपास करीत आहेत.

भय्या उर्फ प्रवीण कांदळकर हा सराईत गुन्हेगार होता. त्याच्यावर दरोडा, खुनाचा प्रयत्न, अपहरण, विनयभंग, लूटमार यासारखे जवळपास 19 गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती वावी पोलिसांनी दिली. त्यामुळेच त्याला दोन वर्षे तडीपारही करण्यात आले होते. शहा येथील गोराणे कुटुंबीय आणि भय्या कांदळकर यांच्यात बऱ्याच दिवसांपासून वाद होते. त्यातूनच काटा काढल्याची चर्चा आहे.

Related Posts

कर्तव्य आटोपून घरी परतताना काळाचा घाला : दुचाकी पाटात पडल्याने अमळनेर पोलीस हेडकॉन्स्टेबलाचा दुर्दैवी मृत्यू
क्राईम

कर्तव्य आटोपून घरी परतताना काळाचा घाला : दुचाकी पाटात पडल्याने अमळनेर पोलीस हेडकॉन्स्टेबलाचा दुर्दैवी मृत्यू

August 10, 2026
उज्ज्वल भवितव्याचे स्वप्न अधुरेच : प्रवेशासाठी धुळे जाताना १९ वर्षीय यशचा रेल्वे अपघातात मृत्यू !
क्राईम

उज्ज्वल भवितव्याचे स्वप्न अधुरेच : प्रवेशासाठी धुळे जाताना १९ वर्षीय यशचा रेल्वे अपघातात मृत्यू !

August 10, 2026
पथदिवे बसवताना काळाचा घाला : वीजेच्या धक्क्याने झिरो वायरमनचा दुर्दैवी मृत्यू !
क्राईम

पथदिवे बसवताना काळाचा घाला : वीजेच्या धक्क्याने झिरो वायरमनचा दुर्दैवी मृत्यू !

August 10, 2026
आहुजा नगरजवळ भरधाव ट्रालाची पादचाऱ्याला धडक; ३५ वर्षीय तरुण गंभीर, चालक फरार!
क्राईम

आहुजा नगरजवळ भरधाव ट्रालाची पादचाऱ्याला धडक; ३५ वर्षीय तरुण गंभीर, चालक फरार!

August 9, 2026
रिक्षात राहिली दीड लाखांची बॅग; ‘नेत्रम’च्या कॅमेऱ्यांनी शोधला धागा, जिल्हा पेठ पोलिसांनी दागिने केले परत!
क्राईम

रिक्षात राहिली दीड लाखांची बॅग; ‘नेत्रम’च्या कॅमेऱ्यांनी शोधला धागा, जिल्हा पेठ पोलिसांनी दागिने केले परत!

August 9, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !
क्राईम

भरदिवसा डॉक्टरांचे घर फोडले : रोकड-दागिन्यांसह ६५ हजारांचा मुद्देमाल लंपास

August 8, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
कर्तव्य आटोपून घरी परतताना काळाचा घाला : दुचाकी पाटात पडल्याने अमळनेर पोलीस हेडकॉन्स्टेबलाचा दुर्दैवी मृत्यू

कर्तव्य आटोपून घरी परतताना काळाचा घाला : दुचाकी पाटात पडल्याने अमळनेर पोलीस हेडकॉन्स्टेबलाचा दुर्दैवी मृत्यू

August 10, 2026
उज्ज्वल भवितव्याचे स्वप्न अधुरेच : प्रवेशासाठी धुळे जाताना १९ वर्षीय यशचा रेल्वे अपघातात मृत्यू !

उज्ज्वल भवितव्याचे स्वप्न अधुरेच : प्रवेशासाठी धुळे जाताना १९ वर्षीय यशचा रेल्वे अपघातात मृत्यू !

August 10, 2026
पथदिवे बसवताना काळाचा घाला : वीजेच्या धक्क्याने झिरो वायरमनचा दुर्दैवी मृत्यू !

पथदिवे बसवताना काळाचा घाला : वीजेच्या धक्क्याने झिरो वायरमनचा दुर्दैवी मृत्यू !

August 10, 2026
आहुजा नगरजवळ भरधाव ट्रालाची पादचाऱ्याला धडक; ३५ वर्षीय तरुण गंभीर, चालक फरार!

आहुजा नगरजवळ भरधाव ट्रालाची पादचाऱ्याला धडक; ३५ वर्षीय तरुण गंभीर, चालक फरार!

August 9, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group